मोठी बातमी; सांताक्रूझमधील गॅलेक्सी हॉटेलला आग, 3 जणांचा मृत्यू

Galaxy Hotel fire: मुंबईतील सांताक्रूझ येथील गॅलेक्सी हॉटेलला भीषण आग लागली आहे. दुपारी एक वाजता आग लागली. सध्या आग आटोक्यात आणण्यात आली आहे. आगीमुळे आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 5 जण जखमी झाले आहेत. अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी हजर असून हॉटेल रिकामे करण्याचा प्रयत्न करत आहेत. गद्दारांचं सुलतानी संकट आसमानी संकटापेक्षा मोठं; उद्धव […]

Galaxy Hotel

Galaxy Hotel

Galaxy Hotel fire: मुंबईतील सांताक्रूझ येथील गॅलेक्सी हॉटेलला भीषण आग लागली आहे. दुपारी एक वाजता आग लागली. सध्या आग आटोक्यात आणण्यात आली आहे. आगीमुळे आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 5 जण जखमी झाले आहेत. अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी हजर असून हॉटेल रिकामे करण्याचा प्रयत्न करत आहेत.

गद्दारांचं सुलतानी संकट आसमानी संकटापेक्षा मोठं; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

आगीचे कारण अद्याप समोर आलेले नाही
हॉटेलला आगीचे कारण अद्याप समोर आलेले नाही. शॉर्ट सर्किट हे कारण असू शकते असे सांगितले जात आहे, परंतु अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. आगीची माहिती हॉटेलमधील लोकांना मिळताच चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली होती. लोक इकडे तिकडे वेगाने धावू लागले होते. अलार्म वाजवून हॉटेल तातडीने रिकामे करण्यात आले आहे.

US Soldier Arrested: कुख्यात दहशतवादी लादेनचा खात्मा करणाऱ्या माजी कमांडरला अटक

Exit mobile version