Boiler Explosion in Midc Area In Dombivli : डोंबिवली एमआयडीसी परिसरात ( <strong>Midc Area In Dombivli ) आज (दि.23) दुपारी दोनच्या सुमारास एका केमिकल कंपनीत बॉयलरचे स्फोट झाले असून, अनेक जण जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. घटनास्थळी मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले असून, या घटनेत नेमका काही जिवीत हानी झाली आहे का? किंवा किती लोक अडकले आहेत. याची ठोस माहिती समजू शकलेले नाही.
निवडणूक चिन्हांची खासबात, जाणून घ्या ‘कमळ’ अन् ‘पंजा’चा इतिहास..
#WATCH | Maharashtra: Fire breaks out due to a boiler explosion in a factory located in the MIDC area in Dombivli. More than four fire tenders rushed to the site.
Details awaited. pic.twitter.com/gsv1GCgljR
— ANI (@ANI) May 23, 2024
मात्र हा स्फोट कशामुळे झाला? याचं नेमकं कारण समोर आलेले नाही. तर प्राथमिक माहितीनुसार डोंबिवली एमआयडीसीमध्ये असलेल्या अमोधन केमिकल कंपनीमध्ये बॉयलरचा स्फोट झाला आहे. या स्फोटचे हादरे अनेक किलोमीटर पर्यंत जाणवले. त्यामुळे परिसरातील अनेक इमारतींच्या काचा फुटल्या आहेत. त्यामुळे हा स्फोट भीषण आणि शक्तिशाली असल्याची शक्यता वर्तनात येते आहे.
इस्त्रायलला दुसरा झटका! ‘या’ देशाची पॅलेस्टाइनला साथ, सुरू करणार दूतावास
अग्निशमन दलाच्या पाच गाड्या या घटनास्थळी दाखल झाल्या असून त्यांच्याकडून गेल्या दीड तासापासून आग विजानाच काम सुरू आहे. मात्र आद्याप देखील या आगेवर नियंत्रण मिळवण्यात यश आले नाही. तसेच दुर्घटनेत सहा ते सात कामगार गंभीरित्या जखमी झाल्याची माहिती देखील समोर येत आहे.