कल्याण-डोंबिवली महापालिकेत तज्ञ डॉक्टरांच्या 56 जागांची भरती, ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज
Kalyan Dombivli Municipal Corporation job : आजचे युग हे प्रचंड स्पर्धात्मक युग आहे. या स्पर्धेच्या काळात नोकरी मिळवणे हे अत्यंत अवघड काम झाले आहे. तुम्हीही बेरोजगार असाल आणि नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात असाल तर आता तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेत आता नोकरीच्या संधी उपलब्ध झाली. कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील कल्याणमधील रुक्मिणीबाई हॉस्पिटल आणि डोंबिवली पश्चिमेतील शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या कमतरतेमुळे रुग्णांना सेवा देण्यात अडचणी येत होत्या. या पार्श्वभूमीवर महापालिकेने पॉली क्लिनिक सुरू करण्याचा निर्णय घेतला असून त्याअंतर्गत पुन्हा एकदा तज्ज्ञ डॉक्टरांच्या नियुक्तीची जाहिरात देण्यात आली आहे. यामध्ये 56 जागा भरल्या जाणार आहेत. 4 ऑगस्ट 2023 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज सादर केले जाऊ शकतात, त्यानंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. (Kalyan Dombivli Municipal Corporation Recruitmnet 56 doctor post last date for apply 4 august)
पात्र आणि इच्छुक उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. या भरतीची अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
कल्याण-डोंबिवली ही महापालिका आता पॉली क्लिनिक ही नवीन संकल्पना सुरू करत आहे. नागरी आरोग्य केंद्रांतर्गत ही सेवा दिली जाणार आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रतिभा पान पाटील यांनी सांगितले की, सिव्हिल हेल्थ सेंटरमध्ये तपासणी केल्यानंतर गरज पडली तर पॉलीक्लिनिकचे तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला रुग्णांना देण्यात येणार आहे.
Nitin Gadkari : पुण्यात लवकरच धावणार स्कायबस! गडकरींनी सांगितला नवा प्रोजेक्ट
एकूण जागा – 56
पदांचा तपशील –
महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये जनरल प्रॅक्टिस असलेल्या डॉक्टरांची गरज आहे. याशिवाय स्त्रीरोगतज्ज्ञ, नेत्रतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, त्वचारोगतज्ज्ञ, कान-नाक-घसा तज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ यांचीही गरज आहे.
आवश्यक कागदपत्रे
10वी परीक्षेची मार्कशीट, सनद, एमएससीआयटी प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र, शैक्षणिक पात्रतेनुसार विविध प्रमाणपत्रे आणि गुणपत्रिका, जात प्रमाणपत्र, वैधता प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्य वैद्यकीय परिषदेची नोंदणी किंवा नूतनीकरण प्रमाणपत्र, पासपोर्ट साईज फोटो, मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, जन्मतारीख प्रमाणपत्र आवश्यक आहे.
निवड पध्दत – मुलाखत
पगार
तज्ञ डॉक्टर पॉली क्लिनिक येथील सिव्हिल हेल्थ सेंटरमध्ये येतील, त्यावेळी त्यांना 2000 रुपये आणि प्रति रुग्ण 100 रुपये दिले जातील. त्या संपूर्ण दिवसात फक्त 5000 रुपये दिले जातील, यापेक्षा जास्त मानधन दिले जाणार नाही.
अधिकृत वेबसाईट-
www.kdmc.gov.in