वळूमाता प्रक्षेत्र पशु संवर्धन विभागाची जागा एमआयडीसीकडे त्वरित वर्ग करा, आ.आशुतोष काळेंची अधिवेशनात मागणी
Ashutosh Kale : कोपरगाव शहरालगत असलेल्या पशुसंवर्धन विभागाच्या मालकीच्या जागेवर काही महिन्यापूर्वी तत्कालीन उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी एमआयडीसी उभारण्यासाठी हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे सदरची जागा तातडीने एमआयडीसीकडे त्वरित वर्ग करावी अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात करून एमआयडीसी (MIDC) उभारण्यासाठी पुन्हा एकदा एक पाऊल पुढे टाकले आहे.
कोपरगाव (Kopargaon) मतदार संघातील विकासा बरोबरच सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या हाताला मतदार संघातच रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी एमआयडीसी उभारण्यात पुढाकार घेवून एमआयडीसीला जागा मिळावी यासाठी पाठपुरावा करीत आहे. त्याबाबत तत्कालीन उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी सकारात्मक चर्चा झालेली असून त्यासाठी कोपरगाव शहरालगत असणारी पशुसंवर्धन विभागाच्या मालकीची जागा एमआयडीसीकडे वर्ग झाल्यास जागेचा प्रश्न मिटणार असून एमआयडीसी उभारण्याला वेग मिळणार आहे. त्यासाठी हि जागा लवकरात वर्ग करण्याबाबत आ.आशुतोष काळे (MLA Ashutosh Kale) यांनी मागणी केली.
तसेच उदय सामंत पुन्हा उद्योगमंत्री झाल्यास त्यांनी एमआयडीसी उभारण्यास चालना द्यावी अशी विनंती उदय सामंत यांना केली. तसेच मागील एक वर्षापासून 191 कोटी निधीतून सुरु असलेल्या 752 जी सावळीविहीर-कोपरगाव रस्त्याचे काम अतिशय धीम्या गतीने सुरु आहे. त्यामुळे वाहनधारकांना व नियमित ये-जा करणाऱ्या प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे त्यासाठी हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे.
मतदारांचे आभार मानन्यासाठी आ. आशुतोष काळेंचा सोमवारी ‘कृतज्ञता सोहळा’
कोपरगाव मतदारसंघातील महत्वाचा राज्यमार्ग असलेल्या राज्य मार्ग 65 वर बाराही महिने सातत्याने अवजड वाहतूक सुरु असते. या अवजड वाहतुकीचा भार वाहणाऱ्या राज्य मार्ग 65 चे काम उच्च दर्जाचे होण्यासाठी या राज्यमार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रुपांतर होवून या रस्त्याच्या कामासाठी एडीबी किंवा हॅम च्या माध्यमातून जास्तीत निधी मिळावा अशी मागणी देखील आ.आशुतोष काळे यांनी केली आहे.
Sangli Accident : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू