धक्कादायक! एमआयडीसीतील कंपनीत वायू गळती, दोघांचा मृत्यू; 10 जण गंभीर
Sangli News : सांगली जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर (Sangli News) आली आहे. जिल्ह्यातील शाळगाव एमआयाडीसीतील एका केमिकल कंपनीत वायू गळती झाली आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या दुर्घटनेत दोन महिलांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. तसेच दहा जण अत्यवस्थ झाले. यातील सात जणांना नंतर कराड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली.
बोंबाळेवाडी-शाळगाव (ता.कडेगाव) येथील एमआयडीसीतील एका कंपनीत वायू गळती झाली. काही वेळातच हा विषारी वायू एमआडीसी आणि आसपासच्या वाड्या वस्त्यांवर पसरला. त्यामुळे कंपनीतील चार कामगार आणि शेजारच्या वस्त्यांवरील सहा जणांना प्रचंड त्रास होऊ लागला. यातील एक महिला आणि आणखी एका जणाचा मृत्यू झाला. अनेक जणांना या विषारी वायूची बाधा झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाच्या यंत्रणांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि सर्वात आधी ही वायूगळती थांबवली.
Company fire: सांगली औद्योगिक वसाहतीतील कंपनीत भीषण आग, आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
कडेगावचे तहसीलदार अजित शेलार आणि पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी घटनास्थळी येत माहिती घेतली. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. ही घटना नेमकी कशी घडली, गळती झालेला वायू नेमका कोणता होता याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पोलीस प्रशासनाने या घटनेची दखल घेत तज्ज्ञांच्या मदतीने तपास सुरू केला आहे.
बोंबाळेवाडी शाळगाव एमआयडीसीत रासायनिक खते तयार करणारी एक कंपनी आहे. गुरुवारी सायंकाळी या कंपनीतून अचानक विषारी वायूची गळती सुरू झाली. काही कळण्याच्या आत हा वायू परिसरासह जवळच्या वस्त्यांवर देखील पसरला. त्यामुळे येथील नागरिकांना श्वास घेण्यास त्रास, डोळ्यांना जळजळ आणि उलट्यांचा त्रास सुरू झाला. कंपनीतील चार कामगार आणि वस्तीवरील सहा नागरिकांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील दोन महिलांचा मृत्यू झाला तर बाकीच्या लोकांची प्रकृती चिंताजनक आहे.
मित्रांचा आग्रह जिवावर बोतला; नव्या गाडीची पार्टी, देहराडूनमध्ये भीषण अपघात, सहा तरुणांचा मृत्यू