Download App

दिल्लीतील शेतकऱ्यांप्रमाणे ट्रक चालकांचा संप चालणार, सरकारला पोलीस राज हवाय; आव्हाड संतापले

Hit and Run Law : हिट अँड रन प्रकरणात केंद्र सरकारने (Hit and Run Law) कठोर भूमिका घेतली अन् तितकेच कठोर नियमही आणले. यामुळे देशभरातील ट्रकचालक संतापले असून त्यांनी संपाचे हत्यार (Truck Driver Protest) उपसले आहे. आज संपाचा दुसरा दिवस आहे. या संपाचे पडसाद राजकारणातही उमटत आहेत. यावर आता राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

14 महिन्यांनंतर रोहित शर्माचे टी-20 मध्ये पुनरागमन? अशी होणार भारत-अफगाणिस्तान सीरीज

आव्हाड म्हणाले की, ट्रक चालकांनी पुकारलेल्या संपाला माझे पूर्णपणे समर्थन आहे. दिल्लीतील शेतकऱ्यांप्रमाणे ट्रक चालकांचा संप चालणार आहे. कारण तेव्हा देखील सरकारला वाटलं होतं की, संप मागे घेतला जाईल पण शेतकरी मागे हटले नाहीत. त्याचप्रमाणे पण माणसं जेव्हा हिंसेला पेटतात तेव्हा ते मरायलाही घाबरत नाहीत. ट्रक ड्रायव्हर उभे राहिले तर भारत बंद करू शकतात. उद्यापासून तुम्हाला पेट्रोल, खाद्यपदार्थ, भाज्या आणि ट्रान्सपोर्ट पूर्ण भारतभर बंद होईल. अशी संतप्त प्रतिक्रिया देत आव्हाडांनी या पंपाला पाठिंबा दिला आहे.

‘पंचक’ रिलीज होण्यापूर्वी माधुरी दीक्षित पतीसोबत सिद्धिविनायकाच्या चरणी; पाहा फोटो

तसेच ते म्हणाले की, जर दरवेळी अपघात होत असताना फक्त ट्रक चालकाचीच चुकी असते का? असं असेल तर तुमचे नियम असे कडक करा की रस्त्याच्या अधून-मधून रस्ता ओलांडताना जर कोणी दिसला तर त्याच्या घरच्यांना दहा लाख रुपये दंड करा. हा कायदा फक्त ट्रक चालकांना नाही छोट्या वाहन चालकांना देखील लागू आहे. या कायद्याने चांगल्या चांगल्या घरातील लोक जेलमध्ये जाणार आहेत. आतापर्यंत जेलची मर्यादा दोन वर्षे होती ती दहा वर्ष केली गेली आहे, त्यांना बेल घेण्यासाठी देखील एक महिना लागेल.

तर सरकारवर टीका करताना ते म्हणाले की, सरकारला पोलिस राज हवा आहे. पोलिसी राज सुरू झालेला आहे. ते पोलिसी राज अंतिम टप्प्यात कुठे जाते ते पुढे कळेल? ट्रक चालक आता घाबरले आहेत पंधरा लाख आणायचे कुठून. पेट्रोल डिझेल सोडून द्या उद्या भाजीपाला दूध जीवनाश्यक वस्तू देखील बंद होणार आहेत. गावोगावी जाणारे पाण्याचे टँकर सुद्धा बंद होतील. हे ट्रक ड्रायव्हर कुठलाही श्रीमंत घरातले नाहीत ते कुठेही उच्चभ्रू सोसायटीत राहत नाहीत. ते रस्त्यावर कुठेही राहतात बायको पोरांच्या लांब राहतात. पण सरकारला गरीब माणसांवर प्रेम नाही आदर नाही. असंही आव्हाड म्हणाले.

follow us