Download App

गुलाबराव शेळके संस्थापक पॅनलच्या विजयावर शिक्कामोर्तब! अपक्ष उमेदवार शिवाजीराव वराळ यांचा गीतांजली शेळके यांना पाठिंबा

Independent candidate Shivajirao Varal supports Geetanjali Shelke : जी.एस. महानगर को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, मुंबई (Mumbai) या बँकेच्या पंचवार्षिक संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी (Election) अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात असलेले शिवाजीराव गणपतराव वराळ यांनी (Shivajirao Varal) आपला बिनशर्त पाठिंबा गीतांजली ताई शेळके यांच्या नेतृत्वाखालील सॉलिसिटर गुलाबराव शेळके (Geetanjali Shelke) संस्थापक पॅनलला जाहीर केला आहे.

या पाठिंब्याचे पत्र आमदार बापूसाहेब पठारे यांच्या प्रमुख उपस्थितीत पॅनल प्रमुख गीतांजली शेळके यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले. यावेळी बँकेचे मार्गदर्शक सी. बा. आडसूळ, भास्कर खोसे, बँकेचे उपाध्यक्ष भास्कर कवाद यांचेसह पॅनेलचे उमेदवार उपस्थित होते. वराळ यांनी स्पष्ट केले की, मी निवडणुकीच्या रिंगणात असलो तरी बँकेच्या हितासाठी मी माझे संपूर्ण समर्थन आणि पाठिंबा या पॅनलला देत आहे. मतदारांनी आपले बहुमूल्य मतदान कपबशीलाच द्यावे, असे मी आवाहन करतो.

‘शेवटचा पत्ता मी पण ठेवलाय…,’ तुरूंगातून बाहेर येताच, रणजित कासलेंचा थेट अजित पवारांना धमकीवजा इशारा

ते पुढे म्हणाले, गीतांजली ताई शेळके यांच्या रूपाने बँकेला दूरदृष्टी असलेले, सक्षम अन् वैध नेतृत्व लाभले आहे. त्यांच्या सुस्पष्ट, अभ्यासपूर्ण व सभासदाभिमुख दृष्टिकोनामुळे माझा विश्वास अधिक दृढ झाला आहे. सॉलिसिटर गुलाबराव शेळके यांच्या विचारधारेचा वारसा लाभलेल्या आणि स्व. उदयदादा शेळके यांच्या प्रमाणेच आपल्या कामाची चुणूक दाखविलेल्या गीतांजली ताईंनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बँकेच्या विकासासाठी घेतलेली दिशा निश्चितच कौतुकास्पद आहे.

एकनाथ शिंदेंची स्मार्ट खेळी! नाशकात ठाकरेंचा माजी आमदार फोडला; भुजबळांनाही शह देणार?

या पॅनलच्या कार्यशैलीत पारदर्शकता, सभासदांविषयी जबाबदारी आणि शाश्वत विकासाचे ध्येय स्पष्टपणे दिसते. म्हणूनच मी आता सॉलिसिटर गुलाबराव शेळके संस्थापक पॅनलच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेण्याचा निर्णय घेतला आहे. या पॅनलसोबत एकनिष्ठ राहणार आहे, असेही वराळ यांनी स्पष्ट केले. शिवाजीराव वराळ यांचा पाठिंबा म्हणजे सॉलिसिटर गुलाबराव शेळके संस्थापक पॅनलच्या विजयावर शिक्कामोर्तब असल्याचेच प्रतित होते.

 

follow us