Download App

India Alliance Logo : सहभागी झालेल्या नव्या पक्षांनी केला खेळ; ‘इंडिया’ आघाडीच्या लोगोला ‘खो’

  • Written By: Last Updated:

मुंबई : एकीकडे मोदी सरकारविरोधात (Modi Government ) देशभरातील प्रमुख पक्षांच्या इंडिया आघाडीत (India Alliance Logo ) सहभागी होणाऱ्या पक्षांची संख्या वाढत आहे. त्यामुळे जरी इंडियाची ताकद वाढत असली तरी, आघाडीत सहभागी होणाऱ्या नव्या पक्षांमुळे इंडिया आघाडीच्या लोगो लाँचिंगला पुन्हा एकदा खो देण्यात आला आहे. मुंबईत सध्या प्रमुख विरोधी पक्षांची बैठक सुरू आहे. यात लोगोचे अनावरण केले जाण्याची शक्यता होती. मात्र, आता लोगोचे आनावरण पुढे ढकलण्यात आले आहे, अशी माहिती विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.

मोठा निर्णय : एक देश, एक निवडणुकीसाठी समितीची स्थापना; माजी राष्ट्रपती असणार अध्यक्ष

मुंबईत इंडिया आघाडीची बैठक सुरू होण्यापूर्वी विजय वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी वडेट्टीवार म्हणाले, लोगोबाबत आमचा विचार सुरू आहे. लोगोबाबत सर्व नेत्यांनी महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. लवकरच त्यानुसार निर्णय होईल. अजून लोगोवर काम बाकी आहे. त्यामुळे आज होणारे लोगोचे अनावरण पुढे ढकलण्यात आले आहे. इंडिया आघाडीत काही पक्ष नव्याने आलेले आहेत त्यांना ही सहभागी करुन घेतले जाणार असून, समिती स्थापन झाल्यानंतर त्या समितीत चर्चा होईल, त्यानंतर लोगो फायनल केला जाणार असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. रोड शो संदर्भात अजून काही क्लिअर झालेले नसल्याचेही यावेळी वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.

मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदारसंघ ठरला; पुण्यातून निवडणूक लढवणार?

लोगो ठरवण्यात मतमतांतर

इंडिया आघाडीत सहभागी होणाऱ्या पक्षांची जरी संख्या वाढत असली तरी, आघीडीच्या ओळखीसाठी गरजेच्या असलेल्या लोगोसाठी मात्र, पक्षात मतमतांतर आहेत. लोगोसाठी इंडिया आघाडीकडे पाच ते सहा पर्याय आहेत. हे सर्व पर्याय नव्याने सहभागी झालेल्या पक्षांसमोर ठेवले जाणार आहेत. त्यानंतर हे समितीसमोर ठेवले जाणार आहे. त्यानंतरच यावर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. दुसरीकडे, प्रत्येक पक्षाला आपलं निवडणूक चिन्ह असताना लोगोला एवढे महत्त्व द्यायचे का? यावरूनदेखील इंडिया आघाडीत मतमतांतर आहेत.

इंडिया आघाडी बैठकीत कोणकोणते निर्णय होणार?

मुंबईतील इंडिया आघाडीच्या बैठकीत आघाडीचे संयोजक कोण असणार हे ठरवलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याशिवाय कोऑर्डीनेशन कमिटीची स्थापनेबाबतही ठोस निर्णय घेतला जाऊ शकतो.

राज्य सहकारी बॅंक घोटाळा; आरोपत्रातून अजित पवारांचं नाव वगळलं! 14 नावांचा समावेश

पवारांकडे ‘इंडिया’ची धुरा येणार?

संयोजकपदासाठी यापूर्वी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे नाव आघाडीवर होते. त्यांच्याच पुढाकारातून इंडिया आघाडी आकारास आल्याचे दिसून आले. त्यांच्या नेतृत्वात पाटणामध्ये आघाडीची पहिली बैठक पार पडली होती. मात्र त्यांनी हे पद स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर मल्लिकार्जून खर्गे यांचे नाव पुढे आले. काँग्रेस हा आघाडीतील सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळेच त्याच पक्षाकडे संयोजकपद असावे अशी काही पक्षांची भूमिका आहे. मात्र पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासारख्या काही नेत्यांचा खर्गेंच्या नावाला विरोध आहे.

Tags

follow us