Maratha Reservaition : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष पेटला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी ओबीसीमधून मराठा आरक्षणाची (maratha Reservaition) मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीला छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यासह ओबीसी नेत्यांनी विरोध केला आहे. सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देणं हे आम्हाला मुळीच मान्य नाही. मराठा आरक्षणाचा पोपट मेला आहे, असं ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी म्हटलं आहे.
ओबीसी समाजाला वेठीस धरणं योग्य नाही. मंडल आयोग, कालेलकर आयोग यांनी कुठल्या जाती मागास आहेत याचं सर्वेक्षण केले आहे. सर्वोच्च न्यायालयानेही हे सांगितले आहे की मराठा समाज मागास नाही. मराठा समाजाच्या आरक्षणाचा पोपट मेला आहे. EWS चं आरक्षण घ्या किंवा वाढवून घ्या हाच त्यावरचा मार्ग आहे. तो मार्ग अंगिकारला तरच ओबीसी आणि मराठा संघर्ष थांबू शकेल, असा इशारा प्रकाश शेंडगे यांनी दिला आहे.
कुणबी लिहिण्याचा कार्यक्रम सुरु
मराठा समाजाला आरक्षण द्या मात्र ओबीसींच्या आरक्षणातून नाही. निजामशाहीच्या पुराव्यांपर्यंत आम्ही मान्य केलं होतं. सध्या आमची माहिती अशी आहे की जिथे जुन्या नोंदी आहेत तिथे मराठा लिहिलं आहे तिथेही कुणबी लिहिण्याचा कार्यक्रम सुरु आहे. अशा प्रकारे सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देणं हे आम्हाला मुळीच मान्य नाही, असे प्रकाश शेंडगे यांनी सांगितले.
‘ओबीसी आरक्षण घटनाबाह्य’ हायकोर्टात याचिका, सरकारला अखेरची संधी
आम्हालाही रस्त्यावर उतरावं लागेल
32 टक्के आरक्षण सांगितले जाते आहे त्यात कोण आहे? कुणबी-मराठा, मराठा कुणबी, लेव्हा पाटील आहेत आणि मराठा आहेत. त्यातून यांना वजा केलं तर किती मराठा उरणार? सामोपचाराची भूमिका प्रत्येकाने घेणं आवश्यक आहे. सरकारने जर सरसकट मराठा समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट केलं तर आम्हालाही रस्त्यावर उतरावं लागेल, असाही इशारा प्रकाश शेंडगे यांनी दिला आहे.
‘आरक्षणाचा GR घेऊन या, भेटच काय गळ्यातच पडतो’; फडणवीसांबद्दल मनोज जरांगेंचं वक्तव्य
भुजबळांची भूमिका योग्यच
छगन भुजबळ यांनी जी भूमिका मांडली ती योग्यच आहे. ओबीसीचे नेते म्हणून ते आमच्या प्रश्नांसाठी लढत आहेत. तरीही त्यांना सरकारमधले काही मंत्री टार्गेट करत आहेत. मराठा समाजाकडूनही त्यांना टार्गेट केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचीच भूमिका छगन भुजबळ यांनी मांडली आहे, असं प्रकाश शेंडगे यांनी म्हटलं आहे.