Jayant Patil : नोव्हेंबर 2008 मध्ये मुंबईवर कसाब (Kasab) या पाकिस्तानी दहशतवाद्याने हल्ला केला होता. या दहशतवादी हल्ल्यात अनेकांचा मृत्यू झाला. काही धाडसी पोलीस अधिकाऱ्यांनाही प्राण गमवावे लागले. या घटनेला आता पंधरा वर्षाहून अधिक काळ लोटला तरीही या हल्ल्याच्या आठवणीने थरकाप उडतो. दरम्यान, तत्कालीन गृहमंत्री आणि सध्याचे शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मुंबईवर झालेला हल्ला पाहून आपण पाकिस्तानात जाऊन बदला घेण्यासाठी प्लॅन आखला होता, अशी माहिती दिली.
Maratha Reservation बद्दल विखेंचं मोठं वक्तव्य कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता…
खासदार अमोल कोल्हे यांच्या टू द पॉईंट कार्यक्रमात बोलतांना पाटील यांनी 2008 मध्ये झालेल्या मुंबई हल्ल्यावर भाष्य केलं. ते म्हणाले, या हल्यात अनेक कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांना जीव गमवावा लागला होता. एटीएसचे हेमंत करकरे यांनाही या हल्ल्यात वीरमरण आलं होतं. त्यानंतरच्या काळात हल्लाचा बदला कसा घेता येईल, याच्या मास्टरमाईड पर्यंत कसं पोहोचता येईल, याचा मी विचार करत होता. कारण, मुंबईवर एवढामोठा हल्ला झाला, आणि आपण काहीच करू शकत नाही. हे मला मान्य नव्हतं. या हल्लाची चौकशी एटीएसकडे न देता, राकेश मारिया यांच्याकडे दिली. त्यानंतर एकदा मी एटीएस कार्यालयात गेलो. करकरेंच्या मृत्यूनं एटीएएस अधिकारी नाराज होते. करकरेंच्या मृत्यानं तुम्ही नाराज आहात, तुमच्यात चीडही आहे… तुम्हाला इन्वहेस्टिगेश करायचं होत, हे सगळ मला कळतं. आपण पाकिस्तानमध्ये जाऊन काही करू शकतो, असं त्यांना विचारलं. तेव्हा काही अधिकाऱ्यांनी पाकिस्तान घुसण्याची तयारी दर्शवली होती, असं पाटील म्हणाले.
पाटील म्हणाले, फक्त कसाबला फाशी देऊन समाधान मिळणार नव्हतं. मात्र, कसाबला ज्यांनी पाठवलं, त्यांच्याविरोधात कारवाई करणं गरजेचं होतं. त्यामुळं मी एका आंतरराष्ट्रीय एजन्सीलाही संपर्क केला होता. हे सगळं मी वैयक्तिक पातळीवर करत होतो. कारण, काहीतरी जॉईंट ऑपरेशन करणं गरजेचं होतं. त्यानंतर कसाबला वकील दिले गेले आणि त्याला फाशी देण्यात आली, असं पाटील म्हणाले.