Download App

Lalbaugcha Raja : तब्बल 24 उलटले तरी बाप्पाचं विसर्जन नाही, भाविकांच्या डोळ्यांत पाणी; हेलिकॉप्टरही आणलं..

समु्द्राला आलेल्या भरतीमुळे विसर्जन आथा संध्याकाळी 6 वाजेपर्यंत लांबणीवर पडलं आहे. अशी स्थिती कधीच निर्माण झाली नव्हती.

Mumbai Lalbaugcha Raja Visarjan 2025 : लाडक्या गणरायाला काल अनंत चतुर्दशीच्या दिवशी भाविकांनी निरोप दिला. “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या”, “बाप्पा चालले आपल्या गावाला चैन पडेना आमच्या मनाला” अशा सुरात गणरायाला निरोप दिला. पुणे मुंबईतील विसर्जन मिरवणुका लक्षवेधी ठरल्या. पुण्यातील मिरवणुका आज दुसऱ्या दिवशीही सुरू आहेत. तर दुसरीकडे नवसाला पावणारा मुंबईतील लालाबागचा राजाही रुसला की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. यामागे कारणही आहे. गेल्या आठ तासांपासून लालबागच्या राजाची मूर्ती गिरगाव चौपाटीवर उभी आहे. विसर्जनासाठी प्रयत्न होत असले तरी अनेक अडचणीही येत आहेत. सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी परिसरात हेलिकॉप्टर फिरत आहे. समु्द्राला आलेल्या भरतीमुळे विसर्जन आथा संध्याकाळी 6 वाजेपर्यंत लांबणीवर पडलं आहे. अशी स्थिती कधीच निर्माण झाली नव्हती. त्यामुळे भाविकांची घालमेल वाढली आहे.

मुंबईतील गणेश विसर्जन मिरवणुका चांगल्याच (Lalbaugcha Raja Visarjan) रेंगाळल्या होत्या. आता सर्व गणेश मंडळांचे विसर्जन झाले आहे. मात्र लालबागचा राजा अजूनही विसर्जनाविनाच आहे. सुरुवातीला मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मूर्ती उचलून तराफ्यावर ठेवण्याचा प्रयत्न केला. पण समुद्राला भरती आलेली होती. आज सकाळी साडेअकरा वाजता हाय टाईडचा इशारा देण्यात आला होता. त्यामुळे पाणी ओसरल्यानंतर विसर्जन करण्याचा निर्णय मंडळाच्या कार्यकर्त्यांनी घेतला.

Ganeshotsav 2025 : पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुका: बाप्पाला निरोप आणि लक्षवेधक पोस्टर ठरले चर्चेचा विषय 

अन् भाविकांच्या डोळ्यांत तरळले अश्रू 

लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल झाला. त्यानंतर येथे आरती करण्यात आली. पुढे विसर्जनाची तयारी सुरू करण्यात येणार होती. यासाठी मूर्ती तराफ्यावर ठेवण्याचे बरेच प्रयत्न केले. दोन ते अडीच तास प्रयत्न करण्यात आले. मात्र तराफ्याची उंची जास्त असल्याने मूर्ती ठेवण्यात अडचणी कायम राहिल्या. एकवेळ तर अशी आली होती की मूर्ती कमरेइतक्या पाण्यात उभी होती. याआधी अशी परिस्थिती कधीच निर्माण झाली नव्हती. त्यामुळे सगळेच गोंधळून गेले.

आपल्याकडून काय चुकलं, लालबागचा राजा खरंच रुसला की काय या काळजीने भाविकांची घालमेल वाढली. जो तो हात जोडून बाप्पा आम्हाला माफ कर अशी प्रार्थना करताना दिसला. काहींच्या डोळ्यांत तर अश्रूही तरळले. बराच वेळ झाला तरी समुद्राचं पाणी काही कमी व्हायला तयार नव्हतं. त्यामुळे पाणी ओसरल्यानंतरच समुद्रात मुर्तीचं विसर्जन करू असा निर्णय लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने घेतला.

Lalbaugcha Raja Visarjan 2025 : समुद्रात मोठी भरती, लालबागच्या राजाचे विसर्जन रखडले

लालबागच्या राजाचा पाट वाळूत फसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मूर्ती तराफ्यावर ठेवण्यात अडचणी येत आहेत. येथील सर्व घडामोडींवर नजर ठेवण्यासाठी चौपाटी परिसरात हेलिकॉप्टर हवेत फिरत आहे. समुद्राला आलेल्या भरतीमुळे विसर्जन थेट रात्री साडेदहा नंतर होईल अशी नवी माहिती मिळाली आहे. पाणी ओसरल्यानंतर मूर्ती तराफ्यावर ठेवण्यात येईल अशी माहिती देण्यात आली.

follow us