Download App

सोमय्या प्रकरणात लोकशाही वाहिनीवर मोठी कारवाई ! पुढील ७२ तास प्रक्षेपण बंद ठेवण्याचे आदेश

नवी दिल्ली : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचा आक्षेपार्ह अवस्थेतील व्हिडिओ लोकशाही (lokshahi marathi ) या मराठी वृत्तवाहिनीवर प्रसारित करण्यात आला होता. याप्रकरणी आता या वृत्तवाहिनीवर कारवाई करण्यात आली आहे. आज सायंकाळपासून ते 25 सप्टेंबर असे तीन दिवस या वाहिनीचे प्रक्षेपण बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. याबाबतची माहिती लोकशाहीचे संपादक कमलेश सुतार यांनी एक्सवरून ही माहिती दिली आहे.

Prakash Ambedkar: महिला आरक्षणाची बिजे कोणी रोवली? प्रकाश आंबेडकरांनी सांगून टाकलं

किरीट सोमय्या बातमी प्रकरणी माहिती प्रसारण मंत्रालयाने लोकशाही वाहिनी आज संध्याकाळी ७ वाजेपासून पुढील ७२ तास बंद करण्याचे आदेश दिले आहेत. आदेश वाहिनीला संध्याकाळी ६.१३ वाजता प्राप्त झाले.22 सप्टेंबर ते 25 सप्टेंबरपर्यंत असे तीन दिवसासाठी प्रक्षेपण बंद ठेवण्याचे आदेश आहेत.या सदर आदेशाबाबत कायदेशीर सल्ला घेत आहोत. कोरा कागद निळी शाही,आम्ही कुणाला भीत नाही, असे कमलेश सुतार यांनी आपल्या एक्स अकाउंटवर पोस्टमध्ये म्हटले आहे. या पोस्टबरोबर कमलेश सुतार यांनी एक फोटोही टाकला आहे.त्यात त्यांच्या तोंडावर पांढरीपट्टी लावली आहे. माहिती व प्रसारण मंत्रालयाकडूनही कारवाई करयण्यात आली आहे.

काही महिन्यांपूर्वी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ लोकशाही वाहिने प्रसारित केला होता. सोमय्या हे एका महिलेशी फोनवरून व्हिडिओद्वारे बोलत आहेत. त्यावेळी सोमय्या हे आक्षेपार्ह अवस्थेत होते. त्यावरून विरोधकांनी किरीट सोमय्यांना घेरले होते. याप्रकरणाची चौकशी मागणी पोलिसांकडून करण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी मुंबई पोलिस करत आहे.

एकनाथ शिदेंनंतर मुख्यमंत्री कोण? आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर बच्चू कडू स्पष्टच बोलले…

या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच हा निर्णय माहिती व प्रसारण मंत्रालयाने घेतला आहे. याबाबत आम्ही कायदेशीर सल्ला घेतोय. आम्हाला आमची बाजू मांडण्याची संधी द्यायला हवी होती,असेही सुतार यांनी एका व्हिडिओद्वारे सांगितले आहे.

Tags

follow us