Sambhaji Raje Chhatrapati On Rajratna Ambedkar: विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीने जोरदार तयारी सुरू केली आहे. दोन्ही आघाड्यांमधील पक्ष जोरदार तयारी करत आहे. या पक्षांचे नेते राज्यभर दौरे काढत आहे. तर वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) हेही आरक्षण बचाव रॅली राज्यात काढणार आहेत. या दोन्ही आघाड्यांविरोधात तिसरी आघाडी होईल का याची चाचपणी सुरू आहे. त्यात आता स्वराज्य संघटनेचे संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati ) यांनी वेगळेच संकेत दिले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर ( Rajratna Ambedkar) यांनी राज्यात फिरविण्याची जबाबदारी माझी आहे, असा जाहीर शब्द दिलाय.
पहिलीच्या पुस्तकातील कवितेत इंग्रजी शब्द; संतप्त युजर्सकडून बालभारती ट्रोल
बहिष्कृत हितकारिणी सभेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त मुंबई येथे एक कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला संभाजीराजे छत्रपती हेही उपस्थित होते. आपल्या भाषणात बोलताना डॉ. राजरत्न आंबेडकर यांना राजकारणात सक्रिय होण्याचे जाहीर आवाहन संभाजीराजे यांनी केले आहे. छत्रपती संभाजीराजे व आंबेडकर आगामी विधानसभा निवडणुकीस एकत्रितपणे सामोरे जाऊ शकतात, याचे स्पष्ट संकेत यातून दिसून येत आहे.
‘लाडकी बहीण’ योजनेनंतर आता ‘गुलाबी रिक्षा’ योजना; कोणत्या शहरात किती रिक्षा मिळणार?
शिवाजी महाराज, शाहू महाराज, फुले, आंबेडकरांचा विचार पुढे नेण्याची जबाबदारी आपली आहे. मला फार मोठ्या अपेक्षा आहेत. मी उगाच कार्यक्रमाला आलेले नाही. शाहू महाराजांचा पणतू आणि बाबासाहेब आंबेडकरांचा पणतू एका स्टेजवर आलेले आहे. त्यात माझा स्वार्थ आहे. राजरत्न आंबेडकर यांची अडचण आहे. ते राजकीय माणूस नाहीत. त्यांना राजकारण आवडत नाही. मलाही राजकारण आवडत नाही. पण पर्याय नाही. शिवाजी महाराज, छत्रपती शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार पुढे नेण्यासाठी आपण आहेत. मागे राहून चालणार नाही. तुम्हाला आवडो नाहीतर ना आवडो, मी म्हणत स्वराज्यात येऊ नका. पण महाराष्ट्रात तुम्हाला फिरविण्याची जबाबदारी माझी आहे. राजकारणात यायचे की नाही, त्यांचा प्रश्न आहे, असेही संभाजीराजे म्हणाले.
संभाजीराजे हे स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून राजकारणात येण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यांचे वडिल शाहू महाराज हे काँग्रेसचे खासदार आहेत. परंतु त्यांनाही राजकारणात यायचे आहे. त्यासाठी अनेक जिल्ह्यात त्यांनी स्वराज्य संघटनेचे मेळावे घेतले आहे. संघटना मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. राज्यात आंबेडकरांचे वशंज आपल्याबरोबर असल्यास फायदा होईल, या विचार त्यांच्या आहे. त्यामुळे असे जाहीर भाष्य त्यांनी केले असावे, अशी राजकीय चर्चा आहे.