संभाजीराजे छत्रपती खरंच शाहू महाराजांचे वंशज आहेत का? इम्तियाज जलील यांचा बोचरा सवाल

संभाजीराजे छत्रपती खरंच शाहू महाराजांचे वंशज आहेत का? इम्तियाज जलील यांचा बोचरा सवाल

Imtiaz Jalil : विशाळगडावरील (Vishalgad) अतिक्रमण हटवण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन करत घरांवर दगडफेक, वाहनांची जाळफोळ केल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. राज्य सरकारने या प्रकरणाची गंभीर दाखल घेत संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांच्यासह शेकडो आंदोलकांवर गुन्हे दाखल करून कारवाई केली. दरम्यान, दगडफेक आणि जाळपोळीवरून एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी संताव्य केला.

Laxman Hake : … म्हणून शरद पवार भुजबळांची भेट, लक्ष्मण हाकेंचा मोठा खुलासा 

अतिक्रमण हटवण्यासाठी हिंदू संघटनांच्या आंदोलनाला रविवारी हिंसक स्वरुप प्राप्त झालं. गजापूरमध्ये हिंदू संघटनांनी दगडफेक आणि जाळपोळ करून घरांचे आणि वाहनांचे नुकसान केले. याविषयी बोलतांना जलील म्हणाले की, संभाजीराजेंबद्दल आम्हाला आदर होता, पण तो आता राहिला नाहीत. ज्याप्रकारे आंदोलकांनी विशाळगडावर गुंडागर्दी केली, मुस्लिम महिला, त्यांच्या कुटुंब आणि घरांवर दगडफेक करत चल्ले चढवले ते पाहता हे जंगलराज आहे की काय? असं वाटलं. विशाळगडावर काही अतिक्रमण असलेही पण ते हटविण्याची काही पद्धत नियम आहे की नाही? कुणीही कायदा हातात घेईल आणि लोकांच्या घरांवर हल्ले करून गाड्यांची नासधूस करेल हे योग्य आहे? असा सवाल इम्तियाज जलील केला.

माझ्यावर शरद पवारांचे अनेक उपकार, पहिल्यांदा त्यांनीच मंत्री केलं…; अजितदादा गटाच्या नेत्याचं विधान 

संभाजीराजेंनी ज्या पद्धतीने विशाळगडावरील हल्लेखोरांचे नेतृत्व केले. ते पाहता संभाजीराजे हे खरंच शाहू महाराजांचे वंशज आहेत का? असा प्रश्न पडतो, असं जलील म्हणाले. संभाजीराजे छत्रपतींनी मला एक पुस्तक भेट दिले होते, पण आता ते नीट वाचण्याची गरज असल्याचा टोलाही जलील यांनी लगावला.

कॉंग्रेस-उबाठावरही टीका
लोकसभा निवडणुकीत मुस्लिमांची मते घेणारे काँग्रेस-राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांचे पक्ष आता कुठे आहेत? ज्या मौलानांनी मुस्लिमांना महाविकास आघाडीला मतदान करायला लावले, ते आता कुठे गेले? या राजकीय पक्षांना फक्त मुस्लिमांची मते हवी आहेत, असंही जलील म्हणाले.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube