माझ्यावर शरद पवारांचे अनेक उपकार, पहिल्यांदा त्यांनीच मंत्री केलं…; अजितदादा गटाच्या नेत्याचं विधान
Hasan Mushrif On Sharad Pawar : शरद पवारांनीच (Sharad Pawar) मला तिकीट देऊन आमदार केलं. त्यांनीच पहिल्यांदा मला मंत्री केलं. माझ्यावर शरद पवारांचे अनेक उपकार आहेत, अशी भावना अजित पवार गटाचे मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी व्यक्त केली. लेट्सअपला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
संभाजीराजे छत्रपतींवर गुन्हा! पोलिसांचं मौन; संभाजीराजेंनी क्लिअर सांगितलं
हसन मुश्रीफ यांनी लेट्सअप मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. यावेळी ते शरद पवारांविषयी बोलले. ते म्हणाले, शरद पवार गटात जाणार का, असा सवाल केला. त्यावर बोलतांना मुश्रीफ म्हणाले की, मंडलिक साहेब आमदार होते, तेव्हापासून माझे पवार साहेबांशी संबंध आहेत. पवार साहेबांनीच मला तिकीट देऊन आमदार केलं. त्यांनीच पहिल्यांदा मला मंत्री केलं. माझ्यावर शरद पवारांचे अनेक उपकार आहेत, असंही मुश्रीफ म्हणाले.
संभाजीराजे छत्रपतींवर गुन्हा! पोलिसांचं मौन; संभाजीराजेंनी क्लिअर सांगितलं
शऱद पवार गटात जाणार का, असा सवाल विचारला असता मुश्रीफ म्हणाले की, अनेकदा भाजप सोबत जाण्यासाठी पवार साहेबांनी अजित पवारांना पुढं केलं आणि ऐनवेळी नकार देऊन अजितदादांना तोंडघशी पाडलं. मात्र, यावेळी आम्ही प्रमुख 9-10 लोकांनी अजित पवांरासोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यावर आम्ही ठाम आहोत, सारखं इकडं-तिकडं करणं लोकंना आवडत नाही. अजित पवारांबरोबर जाण्याची जी भूमिका घेतल्याने पवार साहेबांकडे जाण्याचा प्रश्नच नाही. या मार्गात काटे असो की, फुले असो आम्ही अजितदादांबरोबर आहोत, असं मुश्रीफ म्हणाले.
समरजित घाटगेंना भाजपने दाणे घालू नयेत…; हसन मुश्रीफांनी ठणकावले
अजितदादा गटाचे आमदार शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. रोहित पवारांनी अनेकदा सूचक विधानही केलं. यावरही मुश्रीफांनी भाष्य केलं. आमचा एकही आमदार शरद पवारांकडे जाणार नसल्याचं मुश्रीफ म्हणाले.
सोमय्यांविषयी राग-लोभ नाही
किरीट सोमय्यांनी केलेल्या आरोपांविषयी विचारले असता मुश्रीफ म्हणाले, सोमय्या भारतीय जनता पक्षात असतांना त्यांनी आरोप केले. विरोधक म्हणून त्यांनी त्याचं काम केलं आणि मी कोर्टातून जामीन मिळवण्याचं माझं काम केलं. आता आम्ही महायुतीत आहेत. मला त्यांच्याविषयी राग नाही. मी राग लोभ धरत नाही, असं मुश्रीफ म्हणाले.