Download App

भिवंडीत दोन मजली इमारत कोसळली; दोन जणांचा मृत्यू; 5 जण जखमी

Bhiwandi Building Collapses : भिवंडी शहरातील गौरीपाडा परिसरात आज मध्यरात्रीच्या सुमारास दोन मजली इमारत अचानक कोसळली. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. स्थानिक नागरिकांच्या मदतीने चार जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.

इमारतीचा मागील भाग अचानक कोसळला. ज्यामध्ये अनेक जण या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाची वाहने घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी बचावकार्यास सुरुवात केली. स्थानिकांच्या मदतीने चार जणांना बाहेर काढण्यात आले. या ढिगाऱ्याखाली आणखी सहा जण अडकल्याचे सांगण्यात येत आहे. या सहा जणांना बाहेर काढण्याची मोहिम अग्निशमन विभागाने हाती घेतली. यापैकी चार जणांना बाहेर काढण्यात आले तर दोन जणांचा ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला.

अमेरिका आणि दक्षिण कोरियाला थेट आव्हान, उत्तर कोरियाने पुन्हा डागली क्षेपणास्त्रे

या दुर्घटनेतील जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू असून यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली असल्याने मदतकार्यासाठी अडचणी आल्या. काही दिवसांपूर्वी भिवंडीत एक बिल्डिंग कोसळली होती. त्यामुळे येथील लोक भीतीच्या सावटातच वावरत होते. त्यानंतर पुन्हा अशीच दुर्घटना घडली.

गौरीपाडा भागात जी इमारत कोसळली ती 40 ते 45 वर्षांपूर्वी बांधली असल्याचे सांगितले जात आहे. महापालिकेने या बिल्डिंगला दोन वेळा नोटीस दिली होती. या इमारतीच्या तळमजल्यावर यंत्रमाग कारखाना होता. इमारत धोकादायक आहे म्हणून प्रशासनाने नोटीस दिली होती. पण याकडे दुर्लक्ष करण्यात आले. लोकांना सुरक्षित ठिकाणी घेऊन जाण्यात आले नाही, अशा प्रतिक्रिया येथील स्थानिक नागरिकांना दिल्या.

पावसामुळे भारत-पाक सामना रद्द, पाकिस्तान सुपर-4 मध्ये पात्र

Tags

follow us