Download App

मोठी बातमी! ठाकरेंच्या शिवसेनेची दुसरी यादी जाहीर; श्रीगोंद्यातून अनुराधा नागवडेंना तिकीट

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत आज शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे.

Maharashtra Elections 2024 : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत आज शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने उमेदवारांची दुसरी यादी (Maharashtra Elections) जाहीर केली आहे. या यादीत पंधरा नावांची घोषणा करण्यात आली आहे. या यादीत मुंबईच्या माजी (Mumbai) महापौर श्रद्धा जाधव यांना वडाळा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. भायखळा मतदारसंघातून मनोज जामसूतकर यांना उमेदवारी मिळाली आहे. तसेच विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत प्रवेश करणारे माजी आमदार अनिल गोटे यांना धुळे शहरातून तिकीट मिळालं आहे. दरम्यान, याआधी ठाकरे गटाने ६५ उमेदवारांची यादी जाहीर केली होती. या दुसऱ्या यादीत काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे.

तिढा कायम! आधी घोषणा मग माघार का?, उद्धव ठाकरे चार ते पाच जागी उमेदवार बदलण्याची शक्यता

या दुसऱ्या यादीत काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात मोठा ट्विस्ट आला आहे. अनुराधा नागवडे यांना ठाकरे गटाकडून तिकीट मिळालं आहे. विशेष म्हणजे अनुराधा नागवडे आणि राजेंद्र नागवडे यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर आज त्यांना उमेदवारी देखील मिळली आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपात हा मतदारसंघ शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसला मिळेल अशी चर्चा होती. यासाठी माजी आमदार राहुल जगताप यांनी जोरदार तयारी केली होती.

या घडामोडी होत असतानाच ठाकरेंनी मतदारसंघात थेट उमेदवारच जाहीर करून टाकला आहे. ठाकरे गटाच्या या निर्णयाचा मोठा धक्का राहुल जगताप यांना बसला आहे. आता राहुल जगताप काय निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. राहुल जगताप यांनी कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे ते आता अपक्ष म्हणून रिंगणात उतरणार का याची उत्सुकता आहे.

दुसऱ्या यादीत कुणाला संधी

अनिल गोटे – धुळे शहर
राजू तडवी – चोपडा
जयश्री सुनील महाजन – जळगाव शहर
जयश्री शेळके – बुलढाणा
पवन श्यामलाल जयस्वाल – दिग्रस
रुपाली राजेश पाटील – हिंगोली
आसाराम बोराडे – परतूर
योगेश घोलप – देवळाली (अजा)
सचिन बासरे – कल्याण पश्चिम
धनंजय बोडारे – कल्याण पूर्व
श्रद्धा श्रीधर जाधव – वडाळा
अजय चौधरी – शिवडी
मनोज जामसुतकर – भायखळा
अनुराधा नागवडे – श्रीगोंदा
संदेश भास्कर पारकर – कणकवली

follow us