तिढा कायम! आधी घोषणा मग माघार का?, उद्धव ठाकरे चार ते पाच जागी उमेदवार बदलण्याची शक्यता
Maha Vikas Aghadi Allotment of Seats : महाविकास आघाडीत जागा वाटपाचा तिढा सुरुवातीपासून आहे. तो काही पूर्ण सुटलेला आहे असं नाही. महाविकास आघाडीतील घटकपक्ष शिवसेना उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपर्वी 65 उमेदवारांची यादी जाहीर केली. परंतु, यातील सुमारे चार ते पाच जागांवर काही बदल होण्याची शक्यता आहे.
यातील काही जागांवर काँग्रेसकडून दावा करण्याता आला आहे. तर काही जागांवर राष्ट्रवादी शरद पवरा गट आग्रही असल्याचं कळतय. त्यामुळे महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा काही सुटलेला नाही असंच सध्याचं चित्र आहे. तसंच, आता कोणत्या जागांवर ठाकरे अदलाबदल करतात हे पाहण महत्वाचं ठरणार आहे.
माहीम विधानसभा राज साहेबांना भेट देणार; पहिल्याच प्रचार सभेत अमित ठाकरे जोरदार भाषण
ठाकरे गटाने उमेदवारी संदर्भात पुन्हा एकदा पुनर्विचार केला जावा अशी मागणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून शिवसेना ठाकरे गटाला करण्यात आली आहे. ठाकरेंच्या ज्या तीन ते चार उमेदवारांची नावं बदलली जाणार तिथे महाविकास आघाडीच्या पक्षांतर्गत जागांची अदालाबदल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली.
ठाकरेंच्या पहिल्या यादीत कोण कोण?
चाळीसगाव उन्मेश पाटील
पाचोरा वैशाली सुर्यवंशी
मेहकर (अजा) सिध्दार्थ खरात
बाळापूर नितीन देशमुख
अकोला पूर्व गोपाल दातकर
वाशिम (अजा) डॉ. सिध्दार्थ देवळे
बडनेरा सुनील खराटे
रामटेक विशाल बरबटे
वणी संजय देरकर
लोहा एकनाथ पवार
कळमनुरी डॉ. संतोष टारफे
परभणी डॉ. राहुल पाटील
गंगाखेड विशाल कदम
सिल्लोड सुरेश बनकर
कन्नड उदयसिंह राजपुत
संभाजीनगर मध्य किशनचंद तनवाणी
संभाजीनगर प. (अजा) राजु शिंदे
वैजापूर दिनेश परदेशी
नांदगांव गणेश धात्रक
मालेगांव बाह्य अद्वय हिरे
नाशिक मध्य वसंत गीते
नाशिक पश्चिम सुधाकर बडगुजर
पालघर (अज) जयेंद्र दुबळा
बोईसर (अज) डॉ. विश्वास वळवी
निफाड अनिल कदम
भिवंडी ग्रामीण (अज) महादेव घाटळ
अंबरनाथ (अजा) राजेश वानखेडे
डोंबिवली दिपेश म्हात्रे
कल्याण ग्रामीण सुभाष भोईर
ओवळा माजिवडा नरेश मणेरा
कोपरी पाचपाखाडी केदार दिघे
ठाणे राजन विचारे
ऐरोली एम.के. मढवी
मागाठाणे उदेश पाटेकर
विक्रोळी सुनील राऊत
भांडुप पश्चिम रमेश कोरगावकर
जोगेश्वरी पूर्व अनंत (बाळा) नर
दिंडोशी सुनील प्रभू
गोरेगांव समीर देसाई
अंधेरी पूर्व ऋतुजा लटके
चेंबूर प्रकाश फातर्पेकर
कुर्ला (अजा) प्रविणा मोरजकर
कलीना संजय पोतनीस
वांद्रे पूर्व वरुण सरदेसाई
माहिम महेश सावंत
वरळी आदित्य ठाकरे
कर्जत नितीन सावंत
उरण मनोहर भोईर
महाड स्नेहल जगताप
नेवासा शंकरराव गडाख
गेवराई बदामराव पंडीत
धाराशिव कैलास पाटील
परांडा राहुल ज्ञानेश्वर पाटील
बार्शी दिलीप सोपल
सोलापूर दक्षिण अमर रतिकांत पाटील
सांगोले दिपक आबा साळुंखे
पाटण हर्षद कदम
दापोली संजय कदम
गुहागर भास्कर जाधव
रत्नागिरी सुरेंद्रनाथ (बाळ) माने
राजापूर राजन साळवी
कुडाळ वैभव नाईक
सावंतवाडी राजन तेली
राधानगरी के. पी. पाटील
शाहूवाडी सत्यजीत आबा पाटील