Mumbai News : उल्हासनगर येथील भाजप आमदार गणपत गायकवाड गोळीबार (Mumbai Police) प्रकरणाची घटना ताजी असतानाच मुंबईतील दहिसर भागात गोळीबाराची घटना घडली. या गोळीबारात ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांचा मृत्यू झाला. लागोपाठ होत असलेल्या या गोळीबाराच्या घटनांनी राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होत आहे. सर्रास गोळीबार होत असल्याने बंदुकींच्या परवान्यांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. काल गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही बंदूक परवान्यांचा मुद्दा उपस्थित करत यावर चर्चा केली जाईल असे सांगितले होते. त्यांचे हे वक्तव्य ताजे असतानाच मुंबई पोलिसांनी मोठा (Mumbai Police) निर्णय घेतला आहे.
Abhishek Ghosalkar हत्या प्रकरणात पहिली अटक : मॉरिसशी थेट संबंध, नेमके कारण समोर येणार?
मुंबईतील शस्त्र परवान्यांची माहिती काढण्यास मुंबई पोलिसांनी सुरुवात केली आहे. या परवान्यांची पडताळणी करण्यात येणार आहे. बोगस शस्त्र परवाने बाळगणाऱ्या प्रत्येकावर कारवाई करावी, असे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यामुळे पोलिसांनी मुंबईतील दहा हजारांहून अधिक शस्त्र परवान्यांची पडताळणी सुरू केली आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील व्यक्ती, सुरक्षा रक्षक, व्यावसायिकांसह ज्यांना शस्त्र परवाना देण्यात आला आहे त्यांच्याकडून माहिती घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. मुदत संपलेले, बोगस शस्त्र परवान्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती आहे.
महादेव बेटिंग अॅप प्रकरणात नवा ट्विस्ट; कुरिअर बॉयने ईडीवरच केले आरोप
अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस पूर्वीपासून एकमेकांना ओळखत होते. दोघांमध्ये एक वर्षांपूर्वी वादही झाला होता. दोघांमध्ये वैयक्तिक स्वरुपाचे वादही होते. दोघांमधील वाद मिटल्यानंतर दोघेही मॉरिसच्या ऑफिसमध्ये एकत्र आले होते. मॉरिसने स्वतःच्या कार्यालयात त्याने अभिषेक घोसाळकर यांना बोलावलं आणि फेसबुक लाईव्हही केले. त्यावेळी या दोघांनीही एकमेकांबद्दल कौतुकाचं शब्द वापरल्याचं दिसून येते आहे. दोघांमध्ये बोलणं झाल्यानंतर अचानक मॉरिसने घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडण्यास सुरुवात केली. यानंतर मॉरिसने पिस्तुलातून अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेसह आणखी काही गोळीबाराच्या घटना राज्यात घडल्या. या घटनांचा विचार करता ज्यांच्याकडे शस्त्र परवाना आहे त्या परवान्यांची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले. सध्यातरी हा आदेश मुंबईपुरता मर्यादीत आहे. भविष्यात राज्यासाठीच हा आदेश लागू केला जातो का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.