Download App

कितीही टीका करा, धारावीचं रुपडं अदानीच बदलणार; शासनाचा ‘जीआर’ धडकला!

Adani Dharavi Redevelopment Project : आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धारावीचा चेहरामोहरा बदलला जाणार आहे. राज्य सरकारने धारावीचा पुनर्विकास करण्याची मंजुरी अदानी ग्रुपला दिली आहे. आता अदानी ग्रुप या प्रकल्पावर काम सुरू करण्यास मोकळा झाला आहे. धारावी झोपडपट्टीतील लोकसंख्या 8 लाख आहे. दरम्यान, राजकारणात विरोधी पक्षांकडून नेहमीच अदानींना टार्गेट केले जाते. सरकारचे मित्र तसेच त्यांच्या फायद्यासाठी सरकार काम करत असल्याचा आरोप काँग्रेस नेते सातत्याने करत आहेत. मात्र, सरकारने याचा विचार न करता अदानींनाच बळ देण्याचं ठरवलं आहे.

या परिसराचे सुशोभिकरण आणि विकास करण्याची जबाबदारी अदानी ग्रुपला मिळाली आहे. या प्रोजेक्टचे सीईओ एसव्हीआर श्रीनिवास यांनी सांगितले की रिडेव्हलपेंट प्रोजेक्टसाठी सरकारने अधिसूचना जारी केली आहे. त्यानंतर लवकरच लेटर ऑफ अॅवॉर्डही जारी केले जाईल.त्यानंतर या अदानी समुहाला या प्रकल्पावर काम सुरू करता येईल. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 23 हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

दिल्लीचा अजितदादांना कौल अन् शिंदे गटाने घेतली माघार; राऊतांनी सांगितलं दिल्लीत काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, अदानी ग्रुपने धारावीचा विकास करण्यासाठी बोली लावली होती. समूहाने 5 हजार 69 कोटींची बोली लावली होती. डीएलएफने 2025 कोटी रुपये बोली लावली होती. 240 हेक्टर परिसरातील या झोपडपट्टीत 8 लाख लोक राहतात तसेच येथे 13 हजार लहान मोठे उद्योग सुरू आहेत. येथे शिक्षण आणि स्वच्छतेची परिस्थिती अत्यंत भीषण आहे. आता अदानी ग्रुप धारावीचा हा चेहरा बदलणार आहे.

राज्य सरकारने धारावीचा संपूर्ण परिसर अविकसित क्षेत्र म्हणून निवडला आहे. यासाठी विशेष नियोजन प्राधिकरणाची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये स्पेशल पर्पज व्हेईकल तयार करावे लागेल. ज्यामध्ये 80 टक्के इक्विटी किंवा 400 कोटी रुपये असतील. ज्याची महाराष्ट्राची 20 टक्के इक्विटी किंवा 100 कोटी रुपयांची भागीदारी असेल. एसपीव्हीच्या माध्यमातून पुनर्विकास केल्यानंतर पात्र लोकांना घरे मोफत दिली जातील, असे सांगण्यात आले.

थेट सचिन तेंडुलकर आला बच्चू कडूंच्या रडारवर; CM शिंदेंना पत्र लिहून केली मोठी मागणी

 

Tags

follow us