दिल्लीचा अजितदादांना कौल अन् शिंदे गटाने घेतली माघार; राऊतांनी सांगितलं दिल्लीत काय घडलं?
Sanjay Raut News : राष्ट्रवादी काँग्रेस फोडून सरकारमध्ये आलेल्या अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह नऊ मंत्र्यांना खातेवाटप करण्यात आले. खातेवाटपातही अजितदादांनी आपली पॉवर दाखवत मनासारखी खाती पदरात पाडून घेतली. शिंदे गटाचे आमदार वर्षभरापासून प्रतिक्षेत असताना त्यांचा कोणताही विचार केला गेला नाही. या राजकारणावर आता विरोधी पक्षांनी शिंदे गटाला डिवचण्याचे काम सुरू केले आहे.
कृषीमंत्री होताच धनंजय मुंडे शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी; वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज पत्रकार परिषदेत मोठा गौप्यस्फोट केला आहे. राऊत म्हणाले, माझी पक्की माहिती आहे की दिल्लीला हे गेले. पण, दिल्लीतील नेत्यांनी यांचं काहीच ऐकलं नाही. राहायचं असेल तर राहा, नाहीतर जा. दिल्लीनं त्यांना असा प्रस्ताव दिला की अजित पवारांना अर्थखातं द्यायचं नसेल तर अर्थखातं तुमच्याकडे ठेवा. मुख्यमंत्रीपद अजित पवारांकडे द्या. पण, या प्रस्तावावर हे मागे आले ही माझी पक्की माहिती आहे. अर्थखातं अजित पवार यांनाच देण्यात आलं. जेव्हा हट्ट धरण्यात आला, तेव्हा दिल्लीतील हायकमांडने दोन पर्याय दिले. त्यावर शिंदे गटाची माघार झाली आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला.
शिंदे गटाचं महत्व फक्त शिवसेना फोडण्यापुरतं
ते पुढे म्हणाले, भाजपाची वापरा आणि फेका ही वृत्ती कायम राहिली आहे. देशात अनेक ठिकाणी अशी उदाहरणे घडली आहेत. शिंदे गट व अजित पवार गट यात जमीन अस्मानाचा फरक आहे. अजित पवार यांनी जो निर्णय घेतला त्याच्याशी आम्ही सहमत नाही. अजित पवार आणि त्यांच्या सोबत जे लोक गेले आहेत त्यांचा अनुभव दांडगा आहे. शिंदे गटाचं महत्व फक्त शिवसेना फोडण्यापुरतं होतं. आता त्यांचं काहीच महत्व उरलेलं नाही.
‘अजित पवार अर्थमंत्री, आता उद्धव ठाकरेंकडे परत जा’; काँग्रेस नेत्याचा शिंदे गटाला खोचक सल्ला
शिंदे गट काय करणार, पवारांची धुणीभांडी
आता अजित पवारांची धुणी भांडी शिंदे गटाला करावीच लागतील. अजित पवार नको अशी त्यांची भूमिका होती. पण आता ते सरकारमध्ये आल्यानंतर शिंदे गटातील लोक टाळ्या वाजवत आहेत ही त्यांची मजबुरी आहे.
अजित पवारांना अर्थ खातं देऊ नये यासाठी जंगजंग पछाडले. अजित पवार यांना अर्थ खात्याचा मोठा अनुभव आहे. गेल्या वर्षभरापासून सरकारी तिजोरीची जी काही उधळपट्टी सुरू आहे. त्याला अर्थमंत्री म्हणून अजित पवार नक्कीच आळा घालतील. पक्षाने शिंदेंसह अन्य कुणाला काही कमी दिले होते का या लोकांनी पक्षाचा विस्तार किती केला याचे प्रगतीपुस्तक आहे का? स्वतःपुरतं पाहणारे हे लोक होते असा आरोप राऊत यांनी केला.