कृषीमंत्री होताच धनंजय मुंडे शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी; वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय
परळी : शिंदे सरकारमध्ये नव्याने सामील झालेल्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना काल (14 जुलै) खातेवाटप जाहीर करण्यात आले. तसंच विद्यमान काही मंत्र्यांच्या खात्यांमध्येही बदल करण्यात आले आहेत. या बदलांमध्ये शिवसेनेच्या अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्याकडील कृषी खातं मंत्री राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याकडे सोपविण्यात आलं आहे. या बदलानंतर मुंडे यांच्याकडे कृषीखातं येताच त्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. मुंडे यांनी यंदा त्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. (NCP Minister Dhananjay Munde took decision not to celebrate birth day this year)
बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नाही. आपला बळीराजा संकटाच्या छायेत असताना मी वाढदिवस साजरा करणे संयुक्तिक नाही.
तुम्हा सर्वांचे प्रेम, आशीर्वाद व शुभेच्छा माझ्यासोबत कायमच आहेत. परंतू पावसाच्या प्रतिक्षेत असलेल्या बळीराजाच्या भावनांची जाणीव ठेवत… pic.twitter.com/8eJ8O7NYVZ
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) July 14, 2023
ट्विटरुन निर्णय जाहीर करताना मुंडे म्हणाले, बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नाही. आपला बळीराजा संकटाच्या छायेत असताना मी वाढदिवस साजरा करणे संयुक्तिक नाही. तुम्हा सर्वांचे प्रेम, आशीर्वाद व शुभेच्छा माझ्यासोबत कायमच आहेत. परंतू पावसाच्या प्रतिक्षेत असलेल्या बळीराजाच्या भावनांची जाणीव ठेवत यावर्षीचा वाढदिवस मी साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा करतो, असे ते म्हणाले आहेत.
धनंजय मुंडे पहिल्यांदाच परळीत :
उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच धनंजय मुंडे परळीत दाखल झाले. मंत्री धनंजय मुंडे यांचे कार्यकर्त्यांकडून जल्लोषात स्वागत करण्यात आलं आहे. मुंडेंवर जेसीबीतून पुष्पवृष्टी करण्यात आली आहे. त्यानंतर मुंडे परळीच्या वैजनाथ चरणी नतमस्तक झाले आहेत. छोटेखानी घेतलेल्या सभेत धनंजय मुंडेंनी मायबाप जनतेचे आभार मानले.
“मतदारसंघात चर्चा करुन निर्णय घेतलाय” : अजितदादांच्या नाशिक दौऱ्यापूर्वी सरोज आहिरेंची भूमिका स्पष्ट
यावेळी बोलताना मुंडे म्हणाले, आजचा जनतेचा अभूतपूर्व प्रतिसाद कधी पाहिला नव्हता. जनतेचं हे प्रेम मिळवायला भाग्य लागतं. जीवनात दुसऱ्यांदा मंत्री झाल्यानंतर काय बोलावं, पण सांगायला अभिमान वाटतो या जिल्हातील प्रत्येकाला तुम्हाला शब्द दिला होता की, ज्या ज्या वेळेस राज्यात राजकीय पटलावर कैद करायचा योग येईल, त्या त्या वेळेस परळीच्या वैजनाथाला विचारल्याशिवाय काहीही होणार नसल्याचं म्हणताच जनसमुदायाकडून जोरदार टाळ्यांचा कडकडाट ऐकाय़ला मिळाला आहे.