“मतदारसंघात चर्चा करुन निर्णय घेतलाय” : अजितदादांच्या नाशिक दौऱ्यापूर्वी सरोज आहिरेंची भूमिका स्पष्ट
MLA Saroj Ahire’s support to Ajit Dada : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाशिक जिल्ह्यातील देवळालीच्या आमदार सरोज अहिरे यांनी आज आपला पाठिंबा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला दिला आहे. अजित पवार यांच्या बंडानंतर अद्याप आमदार सरोज अहिरे ह्या आजारी असल्याने त्यांना आपली भूमिका स्पष्ट केली नव्हती. परंतु आज अजित पवार हे नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यांचे स्वागत आमदार सरोज अहिरे स्वतः करणार आहेत. यावेळी बोलताना सरोज अहिरे यांनी आपला पाठिंबा अजित पवार यांना जाहीर केला. (Sharad Pawar another blow, MLA Saroj Ahire’s support to Ajit Dada)
मतदार संघातील विकास कामांसाठी सरकारसोबत जाणे गरजेचे होते. मतदार संघातील लोकांशी चर्चा करून हा निर्णय घेतल्याचे यावेळी आमदार सरोज अहिरे यांनी सांगतले. राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे सर्व 6 आमदार अजित पवारांसोबत गेले आहेत. पुन्हा एकदा अजित पवारांनी आपले काका शरद पवार यांना शह दिल्याचे यानिमित्ताने पाहायला मिळाले.
प्रसिद्ध मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचे निधन, घरातच आढळला मृतदेह
राष्ट्रवादीमधील बंडानंतर अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्यात आमदारांची मोठ्या प्रमाणात रस्सीखेच सुरु आहे. यातच नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ, दिलीप बनकर, नितीन पवार, माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवाळ आणि आता सरोज अहिरे यांनी आपला पाठिंबा अजित पवारांना जाहीर केला आहे, या आमदारानं पैकी छगन भुजबळ हे मंत्रिमंडळात आहेत.
‘शरद पवार वडील तर दादा भावाप्रमाणे ‘
शरद पवार हे आमचे दैवत असून ते विठ्ठलच आहेत, ते आमच्या वडिलांप्रमाणे तर दादा भावाप्रमाणे असल्याची प्रतिक्रिया यावेळी आमदार सरोज अहिरे यांनी दिली आहे. नाशिक हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र आता जिल्ह्यातील जवळपास सर्वच आमदार अजित पवार गटात समील झाले आहेत. नाशिकमध्ये शरद पवार यांच्या गटाला मोठा धक्का बसला आहे.