Download App

‘आनंद दिघेंचं नाव गद्दारांशी जोडू नका, ते निष्ठावंत शिवसैनिक’; राऊतांचा शिंदे गटावर घणाघात

Sanjay Raut News : काल उद्धव ठाकरे यांनी ठाण्यात हिंदी भाषकांचा मेळावा घेतला. त्यावर शिंदे गट आणि भाजपने टीका केली. तसेच धर्मवीर आनंद दिघे यांच्यावरुनही ठाकरे गटाला घेरले. त्यावर आज राऊत यांनी शिंदे गट आणि भाजपाला प्रत्युत्तर दिले. खासदार राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत शिंदे गट आणि भाजपवर घणाघाती टीका केली. कालच्या हिंदी भाषकांच्या मेळाव्यावर शिंदे गट आणि भाजपातील नेत्यांनी केलेल्या टिकेलाही प्रत्युत्तर दिले.

INDIA आघाडीत उद्धव ठाकरेंना शक्तिप्रदर्शनाची संधी… पण शरद पवारांमुळे मिळेना मुहूर्त!

राऊत म्हणाले, दिघे साहेबांच्या अंत्यदर्शनाला कोण कोण उपस्थित होतं हे आम्हाला माहित आहे. तेव्हाचे व्हिडिओ मिळाले तर पाहा. दिघे साहेबांचं नाव गद्दारांसोबत जोडू नका. हा दिघे साहेबांचा अपमान आहे. दिघे हे निष्ठावंत शिवसैनिक होते. बाळासाहेबांचे निष्ठावंत होते. गद्दारांच्या तोंडी त्यांचं नाव ऐकायचं म्हणजे हा त्यांच्या निष्ठेचा अपमान आहे. त्यामुळे हे गद्दार (शिंदे गट) काय म्हणाताहेत याकड लक्ष देण्याची काहीच गरज नाही. काल ठाण्यातील गडकरी रंगायतनमधील हॉल, गॅलरी भरले होते. ही गर्दी पाहून अनेकांच्या डोळ्यांत खुपलं असेल त्यातून अशा प्रकारे टीका करण्यात येत असल्याचे राऊत म्हणाले.

मणिपूर हिंसाचारावरून सरकारवर आगपाखड

या देशातील जनतेची दुःखे जाणून घेण्याला पंतप्रधान शो ऑफ म्हणत असतील तर इतकं क्रूर सरकार आणि राजकारण आम्ही पाहिलेलं नाही. राजधानी इंफाळ शहरात कालही मोठे मोर्चे निघाले होते. देशभरात जिथे कुठे आदिवासी समाज आहे तिथेही मोर्चे निघत आहेत. काल महाराष्ट्रातही तीन ठिकाणी आदिवासी समाजाने मोर्चे काढले. मणिपूर हिंसाचाराबाबत भाजप अभद्र भाषेचा वापर करत आहे मला वाटतं हा संपूर्ण आदिवासी समाजाचा अपमान आहे, अशी टीका राऊत यांनी केली.

Tags

follow us