Varsha Gaikwad Comment on MVA Seat sharing : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर जागावाटप (Mumbai News) जाहीर केलं. आघाडीचे नेत्यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत सारेकाही आलबेल असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला. परंतु, हे चित्र वरवरचं ठरलं. कारण या जागावाटपानंतर विशेष करून काँग्रेसमध्ये धुसफूस वाढली आहे. सांगलीत काँग्रेस नेते कमालीचे नाराज झाले आहेत. तर दुसरीकडे मुंबईत काँग्रेसलाही नाराजीचे धक्के बसू लागले आहेत. काँग्रेसच्या नेत्या आणि माजी मंत्री वर्षा गायकवाड यांनी महाविकास आघाडीच्या जागावाटपावर स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली. मुंबईच्या जागावाटपात मला विश्वासात घेतलं गेलं नाही अशी खंत त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.
मुंबई काँग्रेस विरुद्ध प्रदेश काँग्रेस असा नवा वाद आता काँग्रेसमध्ये निर्माण होताना दिसू लागला आहे. मुंबईचे जागावाटप करताना मुंबई अध्यक्षांना बोलावले नाही म्हणून मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. यासंदर्भात मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी थेट दिल्लीत तक्रार केली आहे. या पार्श्वभुमीवर त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. जागावाटप करताना तुम्हाला विचारलं नाही. प्रदेशच्या नेत्यांनी परस्पर भूमिका घेतली अशा चर्चा आता सुरू आहेत असे पत्रकारांनी विचारले.
Shirdi Loksabha : स्वपक्षातील नाराजी वाढली! शिर्डीतील दोन्ही उमेदवारांच्या अडचणीत भर
त्यावर गायकवाड म्हणाल्या, माझं म्हणणं फक्त इतकंच आहे की मुंबईचं जे अस्तित्व आहे ते वेगळं आहे. मुंबईच्याबाबतीत चर्चा करताना जी आम्हाला अपेक्षा होती. संघटनेत काम करत असताना कार्यकर्त्यांच्या ज्या अपेक्षा असतात. कार्यकर्त्यांना नेहमीच वाटतं की पक्षाला प्रतिनिधीत्व मिळालं पाहिजे. त्यामुळे आमचं म्हणणं असं होतं की महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने काही बाबतीत कठोर भूमिका घ्यायला हवी होती.
आता पक्षश्रेष्ठींकडे आम्ही आमचं म्हणणं मांडलं आहे. आता तर जागावाटपही झालं आहे. परंतु, आम्ही आमचं म्हणणं सातत्याने सांगत आलो आहोत. पत्र निवेदनाद्वारेही पक्ष श्रेष्ठींना कळवलं आहे. शेवटी मी पक्षाचा प्रोटोकॉल मानते. आताची निवडणूक देशासाठी खूप महत्वाची आहे. देशातील संविधान आणि लोकशाही टिकली पाहिजे आहे. त्यामुळे काळात आम्ही आणि काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता कामाल सुरुवात करणार आहे.
Lok Sabha Election 2024 मध्ये हिवरेबाजार जपणार गावाची ‘ती’ परंपरा
होय मी नाराज
मुंबईत आम्ही पाच जागा लढायचो आणि राष्ट्रवादी काँग्रेसला एक जागा मिळायची. महाविकास आघाडीत आम्ही समप्रमाणात सहभागी आहोत. जागावाटपात मी काही प्रमाणात नाराज आहे. आम्हाला कमीत कमी दोन ते तीन जागा मिळायला पाहिजे होत्या, असेही वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या वक्तव्यावरून जागावाटपावरून महाविकास आघाडीतही वाद सुरू आहेत हे आता स्पष्ट होत आहे.