Uran Murder Case : राज्याला हादरवून टाकणाऱ्या उरण येथील हत्याकांडात (Uran Murder Case) महत्वाची माहिती समोर आली आहे. या हत्याकांडातील मुख्य आरोपी दाऊद शेख याला (Karnataka) कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यातील शाहपूर येथून ताब्यात घेण्यात आले. याआधी मयत तरुणीच्या संपर्कात असलेल्या मोहसीन नावाच्या युवकाला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती होती. त्यानंतर या प्रकरणात मुख्य आरोप असलेल्या दाऊद शेखच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं आहे. दाऊद शेखच्या अटकेनंतर त्याने आता गुन्हा मान्य केला आहे, अशी महत्वाची माहिती अतिरिक्त माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त दीपक साकोरे यांनी आज प्रसारमाध्यमांना दिली.
उरण हत्याकांडातील मुख्य आरोपीला बेड्या; पोलिसांनी थेट कर्नाटकातून उचलले
उरण येथील तरुणीच्या हत्या प्रकरणात आरोपी दाऊद शेख याला कर्नाटक येथून अटक करण्यात आली आहे. मयत तरुणी आणि आरोपीमध्ये मैत्री होती, दोघेही संपर्कात होते. आरोपी दाऊद शेखकडून गुन्ह्याची कबुली दिली गेली आहे. दोघांमध्ये वाद झाला आणि त्यानंतर ही घटना घडली असू शकते. आरोपीने ठरवून हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे.
या प्रकरणात तीन ते चार संशयितांची चौकशी केली त्यानंतर सकाळीच दाऊद शेखला पकडले आहे. ताब्यात घेऊन त्याची सखोल चौकशी सुरू आहे. दाऊद शेख आणि तरुणी दोघेही ठरवून भेटले होते. त्यानंतर ही घटना घडली आहे. या प्रकरणी अजून चौकशी सुरू आहे. पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी कर्नाटकात पळून गेला होता. त्याच्या तपासासाठी पोलिसांनी डीसीपी क्राइम आणि डीसीपी झोन 2 सीपींच्या मार्गदर्शनाखाली आठ ते नऊ पथके काम करत होती. मित्र परिवार आणि स्थानिकांकडे चौकशी केली असता काही माहिती मिळाली. त्यातून दोन ते तीन जणांवर संशय होता. या माहितीच्या आधारे नवी मुंबई आणि कर्नाटकात पथक रवाना करण्यात आले होते.
एकतर्फी प्रेमातून तरूणीची निर्घृण हत्या, अत्याचाराचाही संशय; कर्नाटक सीमेवरून आरोपीला अटक
दोन पथके कर्नाटकात थांबली होती. आम्ही त्यांनी येथून इनपुट देत होतो. अखेर आज सकाळी दाऊद शेखच्या मुसक्या आवळण्यात यश आलं अशी माहिती दीपक साकोरे यांनी दिली. ही घटना घडल्यानंतर आरोपीचं लोकेशन काही केल्या मिळत नव्हतं. आरोपी कर्नाटकचा रहिवासी आहे इतकीच माहिती आमच्याकडे होती. त्याच्या मित्राने आम्हाला माहिती दिली होती. या माहितीच्या आधारे आम्ही गुलबर्गा जिल्ह्यातील शहापुराती अलधल गावातून त्याला ताब्यात घेतलं, असेही त्यांनी सांगितले.
ज्या दिवशी तरुणीची हत्या झाली होती. त्या दिवसाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले. या फुटेजमध्ये दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी तरुणी ज्या मार्गावरून गेली तिथूनच आरोपीही दहा मिनिटांनी चालत गेल्याचे दिसून आले होते. यानंतर 26 जुलै रोजी तरुणीचा मृतदेह छिन्न विछिन्न अवस्थेत उरणमधील एका पेट्रोल पंपाजवळ आढळून आला होता. तिच्या शरीरावर अनेक वार करण्यात आले होते. प्रायव्हेट पार्टही चिरडण्यात आले होते. इतक्या अमानुषपणे तिची हत्या करण्यात आली होती.