उरण हत्याकांडातील मुख्य आरोपीला बेड्या; पोलिसांनी थेट कर्नाटकातून उचलले

उरण हत्याकांडातील मुख्य आरोपीला बेड्या; पोलिसांनी थेट कर्नाटकातून उचलले

Uran Murder Case : राज्याला हादरवून टाकणाऱ्या उरण येथील हत्याकांडात (Uran Murder Case) महत्वाची माहिती समोर आली आहे. या हत्याकांडातील मुख्य आरोपी दाऊद शेख याला (Karnataka) कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यातील शाहपूर येथून ताब्यात घेण्यात आले. याआधी मयत तरुणीच्या संपर्कात असलेल्या मोहसीन नावाच्या युवकाला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती होती. त्यानंतर या प्रकरणात मुख्य आरोप असलेल्या दाऊद शेखच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं आहे. मुंबईतील (Navi Mumbai ) उरण या भागात तरुणीची एकतर्फी प्रेमातून तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आली होती. अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. या घटनेने अख्खा महाराष्ट्र सुन्न झाला होता.

एकतर्फी प्रेमातून तरूणीची निर्घृण हत्या, अत्याचाराचाही संशय; कर्नाटक सीमेवरून आरोपीला अटक

उरण येथे राहत असलेली तरुणी बेलापूरमध्ये एका कंपनीत काम करत होती. मात्र गुरुवारी सकाळी कामावर गेलेली ती घरी परतलीच नव्हती. त्यामुळे कुटुंबीयांनी तिच्या बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. यावेळी तपास दरम्यान पोलिसांना रेल्वे स्थानकाजवळ एका झुडपात छिन्न-विच्छिन्न अवस्थेत एक मृतदेह आढळून आला होता. तिची हत्या करण्यात आली होती. एकतर्फी प्रेमातून ही हत्या झाल्याचा पोलिसांचा अंदाज होता. या घटनेमुळे संबंध महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली.

घटनेचं गांभीर्य पाहता पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. या तरुणीच्या संपर्कात असल्याचे आढळून आल्यानंतर पोलिसांनी मोहसीन (पूर्ण नाव माहिती नाही) नावाच्या एका जणाला ताब्यात घेतलं होतं. कॉल डिटेल्सच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली होती. त्यानंतर या हत्याकांडातील मुख्य आरोपी दाऊद शेख कर्नाटकात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

ज्या दिवशी तरुणीची हत्या झाली होती. त्या दिवसाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले. या फुटेजमध्ये दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी तरुणी ज्या मार्गावरून गेली तिथूनच आरोपीही दहा मिनिटांनी चालत गेल्याचे दिसून आले होते. यानंतर 26 जुलै रोजी तरुणीचा मृतदेह छिन्न विछिन्न अवस्थेत उरणमधील एका पेट्रोल पंपाजवळ आढळून आला होता. तिच्या शरीरावर अनेक वार करण्यात आले होते. प्रायव्हेट पार्टही चिरडण्यात आले होते. इतक्या अमानुषपणे तिची हत्या करण्यात आली होती.

शेकापचा दिवा फडफडतोय.. तरीही जयंत पाटील चौथ्यांदा आमदार होतायत!

follow us
  • fb
  • instagram
  • youtube