मुंबई : एकीकडे राज्यात कांद्याच्या प्रश्नावरून घमासान सुरू असतानाच शिंदे-फडणवीस सरकारमधील कॅबिनेट मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी काल (दि.21) वादग्रस्त विधान केले होते. त्यांच्या या विधानावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भुसेंना छापले आहे. दादा भुसेंचे कालचे विधान आणि मस्तवालपणा खोक्यातून आल्याचे राऊतांनी म्हटले आहे. दादा भुसे यांनी कांदा उत्पादकांची बाजू घेताना दोन-चार महिने कांदा खाल्ला नाही, तर काय बिघडते असे वादग्रस्त विधान केले होते. त्यावर राऊतांनी भाष्य केले आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. (Sanjay Raut Maharashtra Onion Issue)
कांद्याच्या वांद्यात फडणवीसांची मध्यस्थी; मोदी सरकारचा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा
काय म्हणाले राऊत
दादा भुसेंच्या विधानाचा समाचार घेत राऊत म्हणाले की, कांदा हे गरिबांचे खाद्य आहे, ते श्रीमंताचे खाद्य नाही. सरकार जर म्हणत असेल की, कांदा परवडत नसेल तर खाऊ नका तर हा सरकारचा मस्तवालपणा आहे. हा मस्तवालपणा खोक्यातून निर्माण झाला असून, ही महाराष्ट्राची संस्कृती नसल्याचेही राऊतांनी म्हटले आहे. हे दीडशहाणे मंत्री कालपर्यंत कृषीमंत्री होते या महाराष्ट्राचे. त्यांना या राज्याची स्थिती माहितेय का?” असा सवालही राऊतांनी भुसे यांना केला आहे.
कुठला सैनिक देशाचे अन् मालमत्तेचे नुकसान करतो; रवींद्र चव्हाणांचा मनसेवर लेटर बॉम्ब
निवडणुकांच्या मुद्यांवरून केंद्राला छापले
कांद्याच्या प्रश्नाशिवाय राऊतांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकरावर निवडणुकांच्या मुद्द्यावरूनही छापले. ते म्हणाले की, तुम्ही विद्यापीठाच्या निवडणुका घ्यायला घाबरता, मनपा निवडणूक घेण्याचा तुमच्यात दम नाही. तर तुम्ही लोकसभा आणि विधानसभेला आमचा काय सामना करणार? असा खडा सवालही राऊतांनी यावेळी उपस्थित केला.
मंत्री छगन भुजबळांना जीवे मारण्याची धमकी! वादग्रस्त विधानानंतर धमकीचा फोन…
तसेच कितीही फोडाफोडी केली तरी त्याचा परिणाम होणार नसल्याचे सांगत सध्याच्या लोकसभेत आमचे 18 खासदार होते आणि ते कायम असल्याचाही दावा राऊतांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस, शिंदे आणि दिल्लीतील सत्ताधारी यांची ही मिलीभगत असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
दादा भुसेंचे विधान नेमके काय?
कांद्याचा प्रश्न पेटलेला असताना दादा भुसेंनी वादग्रस्त विधान केले होते. ते म्हणाले होते की, देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याचे भाव स्थिर राहण्यासाठी केंद्राने निर्यातीवर 40 टक्के शुल्क लागू केले आहे. त्याविरोधात कांदा उत्पादक आक्रमक झाले आहेत. नाशिक ही सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ आहे. निर्यात शुल्कावरून नाशिकमधील बाजार समित्या बंद ठेवण्यात आल्या आहे. केंद्राच्या या निर्णयाने कांदा उत्पादकासाठी व्यापाऱ्यांना फटका बसत आहे.
यावर बोलताना भुसे म्हणाले, कांदा जास्त दिवस टिकत नाही. कांद्यावर प्रक्रिया करण्यासाठी खर्च जास्त लागतो. तो निघत नाही. कांदा 20 ते 25 रुपये किलो झाल्यावर तो कुणाला परवडत नसेल तर त्याने दोन-चार महिने कांदा खाल्ला नाही तर काय बिघडते ? असे विधान भुसे यांनी केले आहे. शेतकऱ्यांच्या कुटुंबाला चार पैसे मिळणार असेल तर त्याची तशी मानसिकता दिसली पाहिजे, असेही भुसे म्हणाले.