एकीकडे शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रखडलेला असतानाच आता या दोन्ही पक्षांमध्ये कल्याण लोकसभा मतदारसंघ तसेच ठाण्याती जागेवर दावा ठोकला आहे. त्यामुळे लोकसभांचे बिगुल वाजण्यापूर्वीच सेना-भाजप युतीत मिठाचा खडा पडला असल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांना टार्गेट करण्यासाठी भाजपची ही खेळी असल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर आता शिंदेंच्या मुलाला भाजपकडून का टार्गेट केले जात आहे याचे उत्तर राष्ट्रवादीने शोधत या मागचे कारणही स्पष्ट केले आहे.
खासदाराला प्रश्न विचारले म्हणून पोलिसांनी डांबून ठेवले, माजी सरपंचाचा आरोप; अमोल कोल्हेंकडून इन्कार
श्रीकांत शिंदेंच्या जागेवर भाजपची नजर
आमच्यामध्ये समन्वय नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांच्यामध्ये तणाव आहे अशा बातम्या शिंदे गटाचे व भाजप प्रवक्ते देत होते. मात्र, श्रीकांत शिंदे जेथून खासदार आहेत त्या जागेवर भाजपची गेल्या वर्षभरापासून नजर असल्याच दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे. ते आज मुंबईत पत्रकारपरिषदेत बोलत होते.
कल्याण – डोंबिवली जागेवर डॉ. श्रीकांत शिंदे हे विद्यमान खासदार आहेत. त्या जागेवर भाजपची एक वर्षापासून नजर असल्याचे तपासे म्हणाले. भाजपने ही जागा इतकी प्रतिष्ठेची केली आहे की, श्रीकांत शिंदे यांना राजीनामा द्यावा लागला तरी चालेल पण वाद नको असे वक्तव्य करावे लागले. मात्र, असे करण्यामागे श्रीकांत शिंदेंना टार्गेट करून उर्वरित दहा खासदारांना कशाप्रकारे टार्गेट करु हे दाखवण्याचा प्रयत्न केला असल्याचे तपासे म्हणाले. एवढेच नव्हे तर, भाजप या सर्वांना कमळ या चिन्हावर निवडणूक लढवावी अन्यथा राजकीय संन्यासाला सामोरे जावे लागेल अशी अट घालेल असा विश्वासही महेश तपासे यांनी व्यक्त केला आहे. तपासे यांनी केलेल्या या खुलाशामुळे राजकीय विश्वात खळबळ उडाली आहे.
लाठीचार्ज केलेले हे वारकरी हिंदू नाही का? रोहित पवारांचा सरकारला सवाल
भाजपने ठाण्यासाठी कंबर कसली?
कल्याण आणि ठाण्यातील लोकसभेच्या जागेवरून भाजप-सेनेमध्ये दुफळी निर्माण झालेली असतानाच, दुसरीकडे भाजपने ठाण्याच्या जागेसाठी कंबर कसल्याचे दिसून येत आहे. भाजपने (BJP) कल्याण पाठोपाठ आत थेट ठाणे (Thane) लोकसभा मतदारसंघावरच दावा ठोकला असून, ठाणे जिल्हा हा पूर्वीपासून भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला आहे, हे दाखवण्यासाठी सर्वांनी सिद्ध व्हा. कार्यकर्त्यांनी बूथवरील लढाई लढल्यास भाजपसाठी ठाणे लोकसभा जिंकणे कठीण नाही, असा कानमंत्र मंत्री रविंद्र चव्हाण यांच्यामार्फत भाजपने दिला आहे. त्यामुळे भाजपने ठाण्याच्या जागेसाठी जोरदार कंबर कसली असल्याची चर्चा यामुळे सुरू झाली आहे.
शिंदे-फडणवीसांच्या ‘राज’ भेटी निष्फळ; निवडणुकांमध्ये मनसेचं इंजिन एकटेचं धावणार?
फडणवीसांवर हल्लाबोल
यावेळी तपासे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरदेखील जोरदार हल्लाबोल केला. दोन दिवसांपूर्वी शरद पवार यांनी राष्ट्रवादीती फेरबदलांवर भाष्य करत राष्ट्रवादी काँग्रेसने भाकरी फिरवली म्हणजे ही धुळफेक असल्याचे विधान फडणवीसांनी केले होते. त्यावर बोलताना तपासे म्हणाले की, हा आमच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे. खासदार सुप्रियाताई सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार असतील या सर्वांना विश्वासात घेऊन अशापध्दतीने भाकरी फिरवण्याचा कार्यक्रम पवारसाहेबांनी केल्याचे ते म्हणाले. संघटनेची राज्याची जबाबदारी जयंत पाटील यांच्यावर आहे तर विधीमंडळाची जबाबदारी अजितदादांवर आहे. कामांचे वाटपही झाले आहे त्यामुळे दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांनी आमच्या पक्षाच्या अंतर्गत बाबीवर फार बोलण्याची आवश्यकता नाही. भाकरी फिरवण्यास सुरुवात झाली आहे त्याचा परिणाम निश्चितच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जनतेला पूर्णपणे दिसेल असेही महेश तपासे यांनी स्पष्ट केले.