शिंदे-फडणवीसांच्या ‘राज’ भेटी निष्फळ; निवडणुकांमध्ये मनसेचं इंजिन एकटेचं धावणार?
MNS Raju Patil on Shinde-Fadanvis : आळंदी येथे रविवारी ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या प्रस्थानावेळी (Dnayeneshar Mauli Palakhi 2023 ) पोलिस (Police) व वारकऱ्यांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर पोलिसांनी वारकऱ्यांवर सौम्य लाठीचार्ज केल्याचे आढळून आले. त्यानंतर सोशल मीडियावर (Social Media) अनेक व्हिडीओ व्हायरल झाले. या व्हिडीओत (Video) पोलिस व वारकऱ्यांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाल्याचे दिसून आले. तसेच काही तरुण वारकऱ्यांनी आम्हाला मारहाण झाल्याचे देखील म्हटले. यावर मनसेचे आमदार राजू पाटील (MNS MLA Raju Patil) यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस (Shinde-Fadanvis) सरकारवर जोरदार निशाणा साधला. ते डोंबिवली सावित्रीबाई फुले नाट्यगृहात मनसेच्या प्रशिक्षण शिबीर दरम्यान बोलत होते. ( MNS MLA Raju Patil Critisize Shinde-Fadanvis due to this statement Chances of an alliance dim )
मात्र राजु पाटलांनी केलेल्या सरकारवरील टीकेमुळे शिंदे-फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीची शक्यता कमी झाल्याचं दिसत आहेमहाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय जनता पक्षाच्या युतीच्या चर्चा असतानाच, फडणवीस राज ठाकरेंच्या निवासस्थानी गेले होते. त्यावेळी राजकीय चर्चांना उधाण आले होते. मात्र ही अनौपचारिक भेट असल्याचं त्यावेळी फडणवीसांनी सांगितलं होतं. मात्र त्यानंतर आता मनसेचे आमदार राजू पाटील यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर केलेल्या टीकेवरून शिंदे-फडणवीस आणि राज ठाकरे या युतीची शक्यता धुसर झाली आहे.
Video : आता वारकरीच आरोपीच्या पिंजऱ्यात; आळंदी लाठीचार्ज प्रकरणातील दुसरा व्हिडीओ समोर
राजू पाटील म्हणाले की, शिंदे गटाच्या विरोधात जे सर्व्हे आलेले आहेत. त्यामध्ये आरएसएसचा सर्व्हे असेल, इतर काही लोकांचे सर्व्हे असेल. त्यात शिंदे गटाला खूप कमी स्थान दिलेलं आहे. त्यातून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी चाललेली सरकारची ही खेळी आहे. तर शिंदे-फडणवीस म्हणजे सेना भाजप एकाच थाळीचे चट्टेपट्टे आहेत. अशी टीका त्यांनी केली आहे.
त्याचबरोबर ते पुढे म्हणाले की, आळंदीत जो प्रकार घडला त्यावर फडणवीस हे त्या पोल़ीस अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली करू शकतात. गृहखात त्यांच्याकडे आहे. मात्र त्यांना लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवायचं आहे. आळंदीला झाला तो समस्त महाराष्ट्र मधील वारकऱ्यांचा अपमान आहे. अमानुषपणे वागणे हे निषेध करण्यासारखी गोष्ट आहे. नागरिकांच लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न आहे. ही त्यांची खेळी आहे. अशी टीका पाटील यांनी केली.