Uddhav Thackeray : महराष्ट्रात राजकीय पक्षांकडून लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election) तयारी केली जात असतानाच ठाकरे गटात वाद उफाळून आला. छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते यांच्यात धुसफूस सुरू झाली. दोघांतील वाद मिटवण्याच्या हालचाली सुरू झालेल्या असतानाच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना आणखी एक धक्का बसला आहे. विधानपरषदेचे आमदार आमश्या पाडवी आज सायंकाळी शिंदे गटात (Eknath Shinde) प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर या घडामोडी घडत असल्याने उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढल्या आहेत.
Eknath Shinde : ‘उद्धव ठाकरेंमध्ये जासूस करमचंद अवतरला’ CM शिंदेंचा खोचक टोला
आमदार पाडवी आज त्यांच्या कार्यकर्त्यांसमवेत ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. पाडवी यांच्याबरोबर नंदूरबार जिल्हा परिषदेचे शिक्षण समितीचे सभापती गणेश पराडके तसेच जिल्ह्यातील ठाकरे गटातील अनेक नेते आणि कार्यकर्ते शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. या पक्ष प्रवेशानंतर आगामी विधानसभा निवडणुकीत आमदार पाडवी यांना उमेदवारी दिली जाणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
या घडामोडींनंतर ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांनीही एक बैठक बोलावली आहे. अक्कलकुवा तालुका वगळता जिल्ह्यातून अन्य कुणीही शिंदे गटात जाणार नाही असे स्पष्ट करण्यात आले. आगामी लोकसभा निवडणुकीत पाडवी इच्छुक होते. हा मतदारसंघ काँग्रेसकडे जाईल अशी शक्यता आहे. परंतु, या मतदारसंघात केसी पाडवी काँग्रेसचे उमेदवार आहेत. त्यामुळे पाडवी यांची मागणी मान्य होणारच नव्हती.
त्यामुळे पाडवी यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतला आहे. आमदार पाडवी अक्कलकुवा येथून कार्यकर्त्यांसह मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. स्थानिक नेत्यांनी मात्र पाडवी यांच्या शिंदे गटातील प्रवेशाला विरोध केला होता. इतकेच नाही तर या नेत्यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेऊन पाडवी यांना प्रवेश देऊ नये अशी मागणीही केली होती.
Uddhav Thackeray : आता मोदी गॅरंटी मिंधेंना पावणार का? उद्धव ठाकरेंचा खोचक सवाल