Download App

मोठी बातमी ! दिनेश वाघमारे राज्याचे नवे निवडणूक आयुक्त

Maharashtra State Election Commissioner Appointment of Dinesh Waghmare: दिनेश वाघमारे हे 1994 च्या बॅचचे वरिष्ठ सनदी अधिकारी आहेत.

  • Written By: Last Updated:

Maharashtra State Election Commissioner Appointment of Dinesh Waghmare: राज्य निवडणूक आयुक्त म्हणून दिनेश वाघमारे यांची सोमवारी नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिनेश वाघमारे यांचे नाव राज्यपालांकडे पाठविले होते. ते नाव अंतिम करण्यात आल्यानंतर सरकारने नियुक्तीची अधिसूचना काढण्यात आली आहे. ते सध्या वैद्यकीय शिक्षण विभागाचे अप्पर मुख्य सचिव होते.

राज्य निवडणूक आयुक्त यूपीएस मदान हे सप्टेंबरमध्ये निवृत्त झालेले आहे. तेव्हापासून हे पद रिक्त आहे. नव्या आयुक्तांची निवड गेल्या काही महिन्यांपासून रखडली होती. आयुक्तपदासाठी माजी मुख्य सचिव नितीन करीर, मुंबई पोर्ट ट्रस्टचे(बीपीटी) माजी अध्यक्ष राजीव जलोटा, नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, वैद्यकीय शिक्षण विभागाचे अप्पर मुख्य सचिव दिनेश वाघमारे यांच्यासह डझनभर सनदी अधिकारी इच्छुक होते.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या आहेत. मुंबई, पुण्यासह राज्यातील महानगरपालिकांवर, जिल्हा परिषदांवर प्रशासकराज आहे. या निवडणुकी येत्या दोन ते तीन महिन्यात होऊ शकतात. त्यामुळे या निवडणुका पार पाडण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.


प्रशासनातील 26 वर्षाचा अनुभव

दिनेश वाघमारे हे 1994 च्या बॅचचे वरिष्ठ सनदी अधिकारी आहेत. त्यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित (महापारेषण) चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहिलेले आहे. ते सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव आहेत. वाघमारे यांना व्यवस्थापन व प्रशासन क्षेत्रातील २६ वर्षांपेक्षा अधिक अनुभव आहे. त्यांनी बी. ई. (इलेक्ट्रॉनिक्स) विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेतून (व्हीएनआयटी) केले आहे. ते आयआयटी खरगपूरचे एम.टेक. (कॉम्प्युटर सायन्स) इंजिनिअर आहेत. इंग्लंडच्या ब्रॅडफोर्ड विद्यापीठातून त्यांनी विकास आणि प्रकल्प नियोजन या विषयातून एमएसस्सी केलेली आहे.

follow us