Dombivli MIDC Chemical Factory Blast : डोंबिवली एमआयडीसीतील (Dombivli MIDC) अमुदान केमिकल कंपनीत भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा आता वाढला आहे. घटनेच्या दुसऱ्या दिवशीही शोधकार्य सुरुच आहे. या दरम्यान आज सकाळी उद्धवस्त अवशेषांमध्ये आणखी तीन मृतदेह सापडले आहेत. अग्निशमन विभागाने हे मृतदेह एनडीआरएफच्या ताब्यात दिले. या दुर्घटनेतील मयतांची संख्या आता 11 वर पोहोचली आहे.
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला; आतापर्यंत १४ मृत्यू, ७४ जखमींना वाचवले
एमआयडीसीती अमुदान कंपनीत गुरुवारी दुपारी बॉयलर फुटून मोठा स्फोट झाला होता. या स्फोटाचे हादरे दोन किलोमीटरपर्यंतच्या परिसरात जाणवले. अनेक इमारतींच्या खिडक्यांना तडे गेले. बॉयलरचे तुकडे दीड किलोमीटर दूरवर फेकले गेले. यातील काही तुकडे वाहनांवर पडले त्यामुळे वाहनांचेही नुकसान झाले.
अग्निशमन विभागाने येथील आगीवर दुपारीच नियंत्रण मिळवले होते. यानंतर शोधमोहिम सुरू करण्यात आली. यावेळी एनडीआरएफच्या पथकाने ढिगाऱ्याखालून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू केले. काही तासांच्या मेहनतीनंतर तीन मृतदेह बाहेर काढण्यात आले. या स्फोटानंतर एमआयडीसी परिसरात रसायने पसरली आहेत. त्यामुळे येथे प्रचंड दुर्गंधी येत आहे. येथे पेंट तयार करणाऱ्या कंपन्या आहेत. येथे केमिकल जाळण्यात येत असल्याने या केमिकलची वाफ हवेत मिसळून सर्वदूर पसरली आहे.
हा स्फोट अमुदान कंपनीतील बॉयलर फुटून झाला. या बॉयलरसाठी कोणतीच परवानगी घेण्यात आली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. चौकशीत असेही दिसून आले की कंपनीत अधिकृत बॉयलरच नाही. यानंतर पोलिसांनी कंपनीचा मालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिसांनी सुरू केला असून या तपासातून आणखी काय माहिती बाहेर येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
अखेर सरकारला आली जाग ! धोकादायक कंपन्या डोंबिवलीतून हलविणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा
या भागात अतिधोकादायक कंपन्या आहेत. रेड कॅटगरीमधील या कंपन्या आहेत. या कंपन्यांची एबीसी अशा कॅटगरी करण्याचे आदेश दिले आहेत. इंडस्ट्रीयल सेफी युनिटला अधिक धोकादायक कंपन्या तातडीने बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. धोकादायक कंपन्यांचे इंजिनिअरिंग, आयटी या क्षेत्रात रुपयांतरीत करता येईल. जिवितेला धोका असणारे उद्योग शहराबाहेर हलविण्याची परवानगी दिली आहे, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.