अनेक जिल्ह्यांत एमआयडीसी फक्त कागदावरच, पुढे त्याचं काही होत नाही; सत्यजित तांबेंची टीका
अहमदनगर – राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये एमआयडीसी (MIDC) ह्या केवळ कागदावर आणि जागेवरच आहेत. अनेक लोकप्रतिनिधी येऊन आमच्या भागात एमआयडीसी पाहिजे, अशी मागणी करत असतात. पण नंतर पुढं त्यांचं काहीच होत नाही. एमआयडीसी उभ्या करून करून रोजगाराच्या संधी उपलब्ध केल्या पाहिजेत, अशी मागणी आमदार सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांनी केली. दरम्यान, नगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड एमआयडीसीवरून (Karjat – Jamkhed MIDC) आमदार रोहित पवार आणि राम शिंदे यांच्यात सध्या संघर्ष सुरू आहे.
आता मुख्यमंत्र्यांचीही चौकशी करता येणार! अण्णा हजारेंना दिलेला शब्द फडणवीसांनी पाळला
राज्याचे हिवाळी अधिवेशन सध्या नागपुरात सुरु आहे. लोकप्रतिनिधी विविध विषयांवर सभागृहामध्ये आवाज उठवत आहे. यातच नगर जिल्ह्यासाठी चर्चेचा ठरलेला विषय म्हणजे कर्जत – जामखेड एमआयडीसी. मात्र या एमआयडीसीचा प्रस्ताव रद्द करण्यात आला आहे. दरम्यान या एमआयडीसीसाठी रोहित पवार यांनी मोठा संघर्ष केला होता. मात्र कर्जत-जामखेड येथे औद्योगिक क्षेत्रासाठी निश्चित केलेली जमीन ही नीरव मोदी यांची असल्याचा आरोप माजी मंत्री राम शिंदे यांनी लावला आहे. यामुळे हा प्रस्ताव रद्द करण्यात आला आहे. या मुद्द्यावरून सध्या शिंदे विरुद्ध पवार असा संघर्ष निर्माण झाला आहे.
फडणवीस हे खोटं बोलताहेत, त्यांच्याकडून दिशाभूल केली जातेय; सुषमा अंधारेंचा आरोप
यातच राज्यातील एमआयडीसीच्या मुद्द्यावरून तांबे यांनी सभागृहामध्ये उद्योगमंत्र्यांना सवाल केला. नंदुरबारमध्ये एमआयडीसीचा एक प्रकल्प झाला व दुसरा प्रकल्प लवकरच करण्याची घोषणा देखील झाली. मात्र, आता नंदुरबारच्या एमआयडीसीचा उल्लेख झाल्याप्रमाणे प्रकल्प साधारण किती दिवसामध्ये सुरू होणार? तसेच त्याची कालमर्यादा काय असणार? असा प्रश्न आमदार सत्यजीत तांबेंनी सभागृहात उपस्थि केला.
तांबे पुढे म्हणाले की, आदिवासी तरुणांच्या हाताला रोजगार द्यायचा असेल. तर त्यांच्या जिल्ह्यात काय पिकतं त्यावर आधारित उद्योगधंदे सुरू झाले पाहिजे. त्यातूनच आदिवासी तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे. नंदुरबार जिल्ह्यात कारखाने सुरू करून तिथे मोहफुलापासून इथेनॉलची निर्मिती केली जाऊ शकते. तसेच उपमुख्यमंत्र्यांनी सांगितल्या प्रमाणे, मोहफुलापासून जर इथेनॉलची निर्मिती केली जाऊ शकते, तर सरकार त्या उद्योगाला सबसिडी देईल. यासाठी आपण कसा पुढाकार घ्याल, असाही प्रश्न आमदार सत्यजीत तांबेंनी सभागृहात मांडला.