Download App

Manoj Jarange यांचं आरक्षणावरच लक्ष विचलित झालंय; सुषमा अंधारेंनी जरांगेंनाच सुनावलं

  • Written By: Last Updated:

Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या मनोज जरांगे (Manoj Jarange ) व मंत्री छगन भुजबळ यांच्यात शाब्दिक युद्ध रंगले आहे. त्यात विरोधकांकडून मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यात येत आहे. मात्र या दरम्यान ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मनोज जरांगे यांनाच खडसावल्याचं पाहायला मिळत आहे.

सुषमा अंधारेंनी जरांगेंनाच सुनावलं…

एका वाहिनीला मुलाखत देत असताना सुषमा अंधारे यांनी जरांगेंर ही टीका केली. त्या म्हणाल्या की, मनोज जरांगे हे सध्या व्यक्तीगत टीका-टिपण्णी करत आहेत. त्यामुळे त्यांचं मराठा आरक्षणावरील लक्ष विचलित होत आहे. मात्र हे त्यांना शोभत नाही. अशा शब्दांत अंधारे यांनी जरांगे यांना सुनावलं आहे.

विवाहबाह्य संबंध आता गुन्हा ठरणार? हिवाळी अधिवेशनात क्रांतीकारी निर्णय होण्याची शक्यता

त्याचबरोबर यावेळी सुषमा अंधारे यांनी जरांगे यांच्या सभांवर होणारा खर्च आणि त्यांच्या जंगी सभांवर देखईल सवाल उपस्थित केला आहे. अंधारे म्हणाल्या की, जरांगे एकीकडे स्वतः ला मागास सांगतात. पण दुसरीकडे आडनावा मागे पाटील लावतात. तसेच आर्थिक मागास असल्याचं देखील जरांगे म्हणतात मात्र दुसरीकडे त्यांच्या जेसीबीने फुलांची उधळन केली जात आहे. सभेसाठी तब्बत 150 एकर मोसंबीचा बाग तोडला जात आहे.

SC च्या पहिल्या महिला न्यायाधीश फातिमा बीवींचे निधन, वयाच्या ९६ वर्षी घेतला अखेरचा श्वास

यावेळी अंधारे यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपवर देखील निशाणा साधला. त्या म्हणाल्या की, मराठा आरक्षण देणं हे केंद्र सरकारच्या हातात आहे. त्यासाठी राज्यसरकारने एक ठराव मंजूर करून केंद्र सरकारला पाठवावा. अशी मागणी अंधारे यांनी केली. मात्र भाजप सरकार आरक्षण देणार नाही. त्यांना केवळ जाती जातींमध्ये भांडण लावायची आहेत.

Tags

follow us