Manoj Jarange Patil Protest In Mumbai : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे आरक्षणाच्या मागणीसाठी आता थेट मुंबईत (Mumbai) दाखल झाले आहेत. मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी लढा देणारे नेते मनोज जरांगे पाटील आज (29 ऑगस्ट) सकाळी भव्य शक्तीप्रदर्शनासह मुंबईत (Azad Maidan) दाखल झाले. मानखुर्द आणि चेंबूर परिसरात त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. शेकडो गाड्यांचा ताफा आणि लाखो मराठा बांधव या मोर्चात सहभागी होत मुंबईत दाखल झाले.
आझाद मैदान ‘हाऊसफुल’
मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदान आंदोलकांनी फुलून गेले (Mumbai Morcha) आहे. राज्यभरातून आलेल्या कार्यकर्त्यांनी मैदानात मोठी गर्दी केली आहे. पोलिसांचा बंदोबस्त तैनात असून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. सरकारकडून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न झाला; मात्र शिष्टमंडळाचे प्रयत्न अपयशी ठरले. जरांगे यांनी आझाद मैदानावर ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण मिळावे (Maratha Morcha) या मागणीसाठी उपोषणाचा निर्णय घेतला आहे.
हल्ल्यानंतर आमदार अमोल खताळ यांची पहिली प्रतिक्रिया, ‘महायुतीच्या कार्यकर्त्यांना माझी विनंती…’
संध्याकाळनंतर काय होणार?
आझाद मैदानावर आंदोलनासाठी संध्याकाळी सहा वाजेपर्यंतच परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे सहा नंतर मनोज जरांगे आणि मराठा आंदोलक पुढे काय भूमिका घेतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या प्रस्तावाला ओबीसी महासंघाने तीव्र विरोध दर्शवला आहे. ‘जर सरकारने मराठ्यांना ओबीसी आरक्षण दिले तर हा आमच्यावर मोठा अन्याय ठरेल, आणि त्याविरोधात आम्ही रस्त्यावर उतरू,’ असा इशारा संघटनेकडून देण्यात आला आहे.
आंदोलनाला मर्यादित परवानगी
आझाद मैदानावर या आंदोलनासाठी पोलिसांनी फक्त आजच्या दिवसापुरतीच परवानगी दिली आहे. यासाठी काही अटी-शर्ती घालण्यात आल्या आहेत.
– पाच हजार लोकांनाच उपस्थित राहण्याची परवानगी.
– मैदानावर स्वयंपाक करण्यास बंदी.
– पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात.
ब्रेकिंग! मनोज जरांगे पाटील मुंबईत दाखल, आझाद मैदानावर आज मराठा आरक्षणासाठी ठिय्या आंदोलन
जरांगे पाटील मोठ्या ताफ्यासह मुंबईत पोहोचले असून, राज्यभरातून हजारो मराठा बांधव आंदोलनासाठी दाखल झाले आहेत. आझाद मैदानात गर्दी वाढत चालली आहे. जरांगे पाटील यांनी आधीच समाजातील लोकांना शिस्त पाळण्याचे आवाहन केले आहे.
संपूर्ण राज्याचे लक्ष आंदोलनाकडे
मनोज जरांगे पाटील यांच्या या आंदोलनाने राज्याचे राजकीय वातावरण तापले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर त्यांनी थेट टीका केली आहे. सरकारशी चर्चा करूनही ठोस तोडगा न निघाल्याने त्यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. या आंदोलनाला फक्त आजची परवानगी असल्याने, दिवसभरात घडणाऱ्या घटनांवर सर्वांचे लक्ष आहे. जरांगे यांनी जाहीर केले आहे की, आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय उपोषण थांबणार नाही.