Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटीत (Manoj Jarange) बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. आज त्यांच्या उपोषणाचा सातवा दिवस आहे. या सात दिवसांच्या काळात त्यांची प्रकृती अतिशय ढासळली आहे. या गोष्टीचा (Maratha Reservation) विचार करता राज्य सरकारनेही वेगाने हालचाली करण्यास सुरुवात केली आहे. यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) पत्रकार परिषद घेत मोठी घोषणा केली. या पत्रकार परिषदेआधी एक महत्वाची माहिती समोर आली आहे.
मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या राज्य मागासवर्ग आयोगाने केलेल्या सर्व्हेक्षणाचा अहवाल राज्य सरकारला सादर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोगाचे अध्यक्षांकडून हा अहवाल स्वीकारला. मराठा आरक्षणासाठी राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन येत्या 20 फेब्रुवारी रोजी बोलावण्यात आले आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केली.
Manoj Jarange : हात थरथरू लागले, नाकातून रक्तस्त्राव; मनोज जरांगेंची प्रकृती खालावली
या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षण आणि राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालावर सविस्तर चर्चा केली जाईल अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. राज्य सरकारकडून आता वेगाने हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडत चालली आहे. या घडामोडी सुरू असतानाच मागासवर्ग आयोगाचा अहवाल आला आहे. यानंतर आता मुख्यमंत्री शिंदे पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवर माहिती दिली. या पत्रकार परिषदेत शिंदेंनी जरांगे पाटील यांच्या उपोषणावर नाराजी व्यक्त करत आता तरी उपोषण मागे घ्यावे असे आवाहन केले.
मुख्यमंत्री शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या या उपोषणावर नाराजीही व्यक्त केली. जरांगे पाटील यांनी उपोषण करायला नको होते. सरकार सकारात्मक असताना आंदोलनाची भूमिका योग्य नाही. त्यामुळे आता त्यांनी आंदोलन मागे घ्यायला हवे, असे आवाहन मुख्यमत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
देशातील 27 टक्के ओबीसी आरक्षण घालवू, भुजबळांच्या बालेकिल्ल्यात मनोज जरांगेंचा घणाघात