Download App

मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर टाकला लाल रंग; आक्रमक ठाकरे गटाची तक्रार, शिवाजी पार्कवर तणाव

Meenatai Thackeray यांच्या पुतळ्यावर अज्ञातांकडून लाल रंग फेकल्याची घटना घडली आहे. त्यावरून आता ठाकरे गट आक्रमक झाला आहे.

  • Written By: Last Updated:

Meenatai Thackeray Statue applied red color UBT aggressive tension at Shivaji Park : मुंबईमध्ये शिवाजी पार्क परिसरामध्ये एक वादग्रस्त घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर अज्ञातांकडून लाल रंग फेकल्याची घटना घडली आहे. त्यावरून आता ठाकरे गट आक्रमक झाला आहे. आज बुधवारी 17 सप्टेंबर रोजी सकाळी 6 ते 7 वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. याबाबत माहिती मिळतात स्थानिक शिवसैनिकांकडून मीनाताई ठाकरे यांच्या स्मारकावरील लाल रंग थीनर टाकून काढला गेला. तसेच या विटंबनेबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेने आरोप केला आहे की, कुणी तरी रंग फेकण्याचा प्रयत्न केला होता.

आयुषच्या खुनासाठी मामा कृष्णानेच दिलं पिस्तूल, मोबाइल फोडला अन्… मारेकऱ्यांची कबुली

दरम्यान या प्रकरणी सुरूवातीला कुणाकडून तक्रार न आल्याने पोलिसांनी स्वत:हून तपास सुरू करण्यात आला आहे. पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे रंग टाकणाऱ्याचा शोध घेत आहेत. त्यामध्ये एक व्यक्ती आढळून आला आहे. त्याचा शोध सध्या पोलिसांकडून सुरू आहे.तसेच या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्क पोलिसांचा मीनाताई ठाकरे यांच्या स्मारकासमोर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

PM Modi Birthday : 11 वर्षातील 11 मोठ्या गोष्टी, ज्याने बदलला देशाचा चेहरामोहरा

तर या स्मारकाबद्दल सांगायचं झालं तर शिवसेनेची स्थापना करणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी असलेल्या मीनाताई ठाकरे यांना देखील शिवसैनिक प्रचंड मानत होते. त्यामुळे जेव्हा 1995 ला त्यांचे निधन झाले तेव्हा शिवाजी पार्क परिसरामध्ये त्यांचा अर्धाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा पुतळा तेथे आहे. पण आज बुधवारी 17 सप्टेंबर रोजी सकाळी 6 ते 7 वाजेच्या दरम्यान मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर अज्ञातंकडून लाल रंग फेकल्याची घटना घडली आहे.

follow us