Aashish Shelar News : मराठी भाषेच्या (Marathi Language) मुद्द्यावरुन उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे काल मुंबईत एकाच मंचावर आल्याचं दिसून आलं. मराठी भाषेच्या मुद्द्यावर आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्रित राहणार असल्याचंही समोर आलं. या कार्यक्रमातून दोन्ही बंधूंनी भाजपवर कडाडून टीका केली. या टीकेला आता सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार (Aashish Shelar) प्रत्युत्तर दिलंय. महापालिकेच्या सत्तेसाठीच मनसेची दाढी कुरवाळण्याचं काम सुरु असल्याचं प्रत्युत्तर आशिष शेलार यांनी दिलंय. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
पुढे बोलताना आशिष शेलार म्हणाले, सत्ता होती तेव्हा उद्धवजींनी भाजपच्या दाढ्या कुरवाळल्या. केंद्रापासून ते महापालिकेपर्यंत आमच्या जीवावर उद्धवजींचं सरकार मिळालं, त्यानंतर मुख्यमंत्रिपदाची लालसा लागल्यावर राष्ट्रवादी आणि काँग्रेसची दाढी कुरवाळली. आता महापालिकेची सत्ता जाईल म्हणून मनसेची दाढी कुरवाळण्याचं काम सुरु आहे. त्यामुळे दाढी, दाढीवाला आणि दाढी कुरवळणारा याची एक्सपर्टची ही संजय राऊत आणि ठाकरे गटाकडे असल्याची जहरी टीका शेलार यांनी केलीयं.
मराठी भाषा हा विषय राजकारणाचा नाही
आमच्या दृष्टीने मराठी भाषा विषय अस्मितेचा, अभिमानाचा आणि जिवलग आहे. हा विषय राजकारणाचा नाही. निवडणुकीच्या विषयात आम्ही मागील वर्षीपेक्षा कमी जागा ठाकरे गटाच्या कमी जागा येतील कारण ये पब्लिक है सब जानती है. कोणाची मुले कुठे शिकली ते किती भाषा शिकले त्यांचे मित्र कोण आहेत. ते खानसोबतच सिनेमा बघतात. सिनेमा करण्यासाठी त्यांना जावेद अख्तरच हिंदी भाषण लागतं. त्यामुळे मराठीची अस्मिता विद्यार्थ्यांचं हित आणि हिंदूरक्षण याच्यावर आम्ही विकासाचं राजकारण करती आहोत यांचा पराभव अटळ आहे त्यामुळेच यांचा प्रयत्न एकमेकांशी जोडून बळ निर्माण करण्याचा असल्याचं आशिष शेलार म्हणाले आहेत.
आमच्या उठावाने आडवे झाले ते आता उठण्यासाठी.., एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
दोन भाऊ एकत्र झाले याचा आनंद…
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही भाऊ एकत्र झाले याचा आम्हाला आनंदच आहे, खूप छान झालं आहे. दोन पक्ष एकत्र येतील की नाही आलेत का हा त्यांचा प्रश्न आहे, त्यांचा तो सर्वस्वी निर्णय आहे. त्यावर आम्ही काय प्रतिक्रिया दिली पाहिजे ही आजची वेळ नाही, असंही ते म्हणाले आहेत.
एकाचं भाषण अपूर्ण तर दुसऱ्याचं अप्रासंगिक…
कालच्या कार्यक्रमात झालेली भाषण हा कार्यक्रम पाहून वाटतं की, एकाच भाषण अपूर्ण दुसऱ्याचं भाषण अप्रासंगिक आणि संपूर्ण कार्यक्रम अवास्तव आहे. एकाने मराठी विषयावरच राहण्याच प्रयत्न केला पण मांडणी करताना मांडलेले मुद्दे विपर्यासाचे होते. माहिती संपूर्ण नाही . त्रिभाषा सुत्री कधी आली कोणी आणली याबद्दलची माहिती चुकीची दिली. देशात अन्य कुठे भाषा आहे साधं गुगल केलं तरीही सापडले. विषय मराठीचा ‘ट’ ला ‘त’ प ला ‘फ’ आणि ‘ग’ ला ‘घ’ असं बिंबवलं गेलं असल्याचं आशिष शेलार म्हणाले आहेत.