“एकत्र आलो आहोत एकत्र राहण्यासाठी, आमच्यातील अंतरपाट..”, राज साक्षीने उद्धव ठाकरेंची घोषणा

Uddhav Thackeray : मुंबईतील वरळी डोम येथे मनसेप्रमुख राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थिती विजयी मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एख एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघाती टीका केली. ते म महापालिकेचा म महापालिकेचा नाही तर म महाराष्ट्राचा. आम्ही महाराष्ट्रही काबीज करू असा रोखठोक इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. आमच्या दोघांत आंतरपाट होता. तो आता अनाजीपंतांनी दूर केला. अक्षता टाकण्याची अपेक्षा तुमच्याकडून नाही. एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठी असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, ‘म’ महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे आम्ही महाराष्ट्रही काबीज करू. सत्ता येते आणि जाते असं शिवसेनाप्रमुख म्हणायचे. आपली ताकद एकजुटीत असली पाहिजे. विधानसभेत त्यांनी (भाजप) जे काही केलं बटेंगे तो कटेंगे. हिंदू-मुसलमान केलं. त्यांनी खरंतर मराठी आणि मराठीतरांत फूट पाडली. गुजरातमध्येही त्यांनी असंच केलं. पटेलांना वेगळं केलं आणि बाकीचा समाज एकत्र केला.
महाराष्ट्रातही तेच केलं. मराठी माणूस मराठी माणसाशी भांडला आणि दिल्लीच्या गुलामांनी सत्ता काबीज केली. त्यांचे डाव ते करतच असतात. आमचे पंतप्रधान जगभरात फिरतात. स्टार ऑफ घाणाचा पट्टा घालतात. इकडं घाण आणि तिकडं घाणा. आपला शेतकरी नांगराचं जोखड घेऊन शेती करतोय पण तिकडे पंतप्रधान स्टार ऑफ घाणाचा पट्टा घालतात. लाज वाटली पाहिजे.
जे बाळासाहेब यांना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं, राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना टोला
आज सकाळी मी वर्तमानपत्रात दोन बातम्या वाचल्या. एक होती लाडक्या बहिणीचं पोर्टल बंद होणार. नवी नोंदणी होणार नाही आता बसा बोंबलत. दुसरी बातमी म्हणजे सर्वात जास्त कर्ज महाराष्ट्रावर. महाराष्ट्र आता थांबणार नाही कर्ज काढतच राहणार. मी ज्यावेळी मुख्यमंत्री होतो त्यावेळी अजित पवार यांच्या उपस्थितीत मराठी भाषा भवनाचं भूमिपूजन केलं होतं. ते आता कुठे गेलं असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला.
भाजपवाल्यांना लग्नालाही बोलावू नका
आमच्यावर भाषेची सक्ती का करता. आम्ही कोणत्याही भाषेच्या विरोधात नाही. पण जर तुम्ही सक्ती केली तर आम्हीही आमची शक्ती दाखवू. आता आपण एककत्र आलोय. त्यामुळे त्यांच्याकडून काड्या घालण्याचे उद्योग होत राहतील. मी तर म्हणतो या भाजपवाल्यांना लग्नाला सुद्धा बोलावू नका. येथेही भांडणं लावून दुसऱ्या लग्नाला निघून जातील, असा खोचक टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.
आम्ही मराठीसाठी गुंड आहोत : संजय राऊत कडाडले, मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल…