Mira Road : मीरा भाईंदरमध्ये बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकऱ्या बांधून ठेवण्यावरुन तणावाची परिस्थिती निर्माण झालीयं. दि. 25 मे रोजी झालेल्या वादात एक जण गंभीर जखमी झाला असून हा वाद थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यापर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे या परिसरात पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलायं.
बकरी ईदसाठी बकरा आणला, हिंदुत्ववाद्यांनी डुक्करच आणलं
मीरा भाईंदरमध्ये बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकऱ्या बांधून ठेवण्यावरुन तणावाची परिस्थिती निर्माण झालीयं. #mirabhainder #bakriid pic.twitter.com/uKxUY6LElU
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) May 27, 2026
मिरा रोड परिसरातील पूनम क्लस्टर गृहसंकुलाच्या मोकळ्या जागेत शेड उभारुन या शेडमध्ये बकऱ्या बांधून ठेवल्या होत्या. त्यामुळे परिसरातील रहिवाशांना दुर्गंधीचा त्रास होत असल्याने रहिवाशांनी विरोध दर्शवला. या कुर्बानीला विरोध करीत हिंदू कार्यकर्त्यांनी थेट डुक्करच आणलं. या कारणामुळे मीरा रोड परिसरात दोन गटांत वाद झाला आहे.
राष्ट्रवादीत धुसफूस कायम! मुंबईत असून पटेल गैरहजर तर तटरे भुजबळांमध्ये बैठकीत खडाजंगी
कालपर्यंत या परिसरात तणावपूर्ण वातावरण कायम होतं. या परिसरातील काही रहिवाशांना धमकावल्याचा आरोपही करण्यात आलायं. काही संघटनेचे अनेक कार्यकर्ते या परिसरात जमले होते. जोरदार घोषणाबाजी सुरु होती. अखेर पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करुन परिस्थिती नियंत्रणात आणली.
या घटनेनंतर आमदार नरेंद्र मेहता यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करीत गृहसंकुलात ठेवण्यात आलेल्या बकऱ्या हटवण्याची मागणी केली. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ बकऱ्या हटवण्याचे आदेश दिल्यानंतर महापालिकेने सर्व बकऱ्या गृहसंकुलातून हटवून महापालिकेने निश्चित केलेल्या ठिकाणी हलवल्या आहेत. त्यानंतर या परिसरातील वातावरण शांत झाले.
