राष्ट्रवादीत धुसफूस कायम! मुंबईत असून पटेल गैरहजर तर तटरे भुजबळांमध्ये बैठकीत खडाजंगी

या बैठकीला उपस्थित असलेले ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांनी एक महत्वाचा मुद्दा मांडला त्यावरुन ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि तटकरे यांच्या खंडाजंगी झाल्याचंही म्हटलं जात आहे.

News Photo   2026 05 26T215510.251

आज राष्ट्रवादी पक्षाच्या महत्वाच्या बैठकीला (NCP) वरिष्ठ नेते प्रफुल पटेल मुंबईत असूनही गैरहजर असल्याने विविध तर्कविर्तकांना उधाण आलं आहे. त्यातच या बैठकीत ज्येष्ठे नेते छगन भुजबळ आणि सुनील तटकरे यांच्यातही भर बैठकी खंडाजंगी झाल्याचं वृत्त आहे.

मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती.पक्षाचे विधानसभेचे आणि विधान परिषदेचे आमदार या बैठकीला हजर होते. मात्र, मुंबईत असूनही वरिष्ठ नेते प्रफुल पटेल हे या बैठकीला गैरहजर राहिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या बैठकीला उपस्थित असलेले ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांनी एक महत्वाचा मुद्दा मांडला त्यावरुन ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि तटकरे यांच्या खंडाजंगी झाल्याचंही म्हटलं जात आहे.

पुणे स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीतच रस्सीखेच, सुनेत्रा पवारांपुढे मोठा पेच

सुनील तटकरे यांनी आपल्यावर आणि प्रफुल पटेल या ज्येष्ठ नेत्यांवर आणि पक्षावर टीका होत असताना पक्षातील इतर कोणताही नेता किंवा नेतृत्व आमचे समर्थन करत नसल्याची खंत यावेळी व्यक्त केली. सुनील तटकरे यांच्या या मुद्यावर छगन भुजबळांनी आक्षेप घेतला. जे झालं ते झालं ते सोडून द्या आता पुढे जाऊया असा सल्ला भुजबळ यांनी तटकरे यांना दिला. त्यावरुन दोघात खंडाजंगी झाल्याचं म्हटलं जात आहे.

प्रफुल पटेल हे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत. त्याच्या पदावरुनही संभ्रम आहे. ते या देवगिरी बंगल्यावर झालेल्या पक्षाच्या महत्वाच्या बैठकीला गैरहजर राहिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. अजितदादांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचा कारभार सुरु झाला आहे. मात्र, पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना डावलेले जात असल्याचे पक्षातील दुसऱ्या फळीतील नेत्यांची भावना आहे. तसेच राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये या घडामोडीने चलबिचल होत आहे. या सर्व घडामोडीमुळे मध्यंतरी शरद पवार यांना भेटण्यासाठी काही आमदार आणि सुनील तटकरे गेल्याने पक्षामध्ये एकंदर गोंधळाचे वातावरण आहे.

follow us