ED Notice : रोहित पवारांचा ईडीला आग्रह, दोन दिवस आधीच येतो

Rohit Pawar : शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांना आज ईडीने (ED) नोटीस बजावली आहे. त्यांना 24 जानेवारीला चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बारामती अ‍ॅग्रो कंपनी तसेच खासगी कंपन्या या संबंधित व्यवहारासंदर्भात ही नोटीस पाठवण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ही नोटीस मिळाल्यानंतर आता आमदार रोहित पवारांनी ईडीकडे एक […]

रोहित पवारांना मोठा धक्का ! बारामती अॅग्रोने खरेदी केलेला कन्नड साखर कारखाना ईडीकडून जप्त

Rohit Pawar (2)

Rohit Pawar : शरद पवार गटाचे आमदार रोहित पवा (Rohit Pawar) यांना आज ईडीने (ED) नोटीस बजावली आहे. त्यांना 24 जानेवारीला चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बारामती अ‍ॅग्रो कंपनी तसेच खासगी कंपन्या या संबंधित व्यवहारासंदर्भात ही नोटीस पाठवण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ही नोटीस मिळाल्यानंतर आता आमदार रोहित पवारांनी ईडीकडे एक मागणी केली आहे. २४ तारखेऐवजी २२ किंवा २३ तारखेलाच चौकशीला बोलवावं, असा आग्रह रोहित पवारांनी केला.

सुजय विखेंची साखर पेरणी थेट अण्णा हजारेपर्यंत, राजकीय चर्चांना उधान 

ईडीची नोटीस मिळाल्यानंतर रोहित पवारांनी एक ट्वीट करत लिहिलं की, ED च्या बातमीमुळं राज्यातून अनेकांनी फोन/मेसेज केले. या सर्वांचे मनापासून आभार मानतो, परंतु काळजीचं काहीही कारण नाही. कोणत्याही अधिकाऱ्यांची चूक नसते तर ते केवळ आदेशाचं पालन करुन त्यांचं काम करत असतात. म्हणून त्यांना सहकार्य करणं हे आपलं कर्तव्य आहे, असं रोहित पवारांनी लिहिलं.

त्यांनी पुढं लिहिलं की, आजपर्यंत सर्वच यंत्रणांना सहकार्य केलं आणि यापुढंही राहील. म्हणूनच ED ला विनंती केलीय की, मराठा आरक्षणाचा विषय महत्त्वाचा असून राज्यभरातून आंदोलक मुंबईत येत आहेत. या पार्श्वभूमीवर २४ तारखेऐवजी २२ किंवा २३ तारखेलाच चौकशीला बोलवावं, तशी माझी तयारी आहे. मला अपेक्षा आहे की, ही विनंती मान्य करेल, असं ट्वीट त्यांनी केल.

स्वतःच्या करिअरशी तडजोड करणारा पती अन् कुटुंबाचा पाठिंबा पूजाला MPSC मध्ये यश देणारा ठरला 

दरम्यान, बारामती अ‍ॅग्रोबाबत ईडी गेल्या वर्षभरापासून सक्रिय आहे. रोहित पवार हे या कंपनीचे संचालक आहेत. ईडीच्या छाप्यानंतर ईडीने त्यांना आता चौकशीसाठी बोलावले आहे. त्यांना बुधवारी 24 जानेवारीला चौकशीसाठी येण्यास सांगितले आहे.

रोहित पवार हे शरद पवार यांचे नातू आणि कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवारांचा गट सामील झाला. मात्र, रोहित पवार यांनी शरद पवारांनी साथ सोडली नाही. रोहित पवार हे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात आहेत. यामुळे ईडीने त्यांना नोटीस पाठवल्याचे बोलले जात आहे.

Exit mobile version