दादांची पवार साहेबांच्या वयावर टीका पण भाजपची 80 वर्षांच्याच शिंदेंना ऑफर; रोहित पवारांचा निशाणा

दादांची पवार साहेबांच्या वयावर टीका पण भाजपची 80 वर्षांच्याच शिंदेंना ऑफर; रोहित पवारांचा निशाणा

Rohit Pawar : राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार आणि शरद पवारांचे नातू रोहित पवार (Rohit Pawar) यांनी भारतीय जनता पक्ष काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांना ऑफर देण्याचा प्रयत्नांत असल्याच्या चर्चेवर आमदार रोहित पवार यांनी भाजपवर टीका केली. ते म्हणाले की, दादांची पवार साहेबांच्या वयावर टीका पण भाजप 80 वर्षांच्याच शिंदेंना ऑफर देत आहे.

बॉक्स ऑफिसवर कतरिनाच्या ‘मेरी ख्रिसमस’ने केली निराशा, बजेटच्या तुलनेत केली फक्त इतकीच कमाई

रोहित पवार अहमदनगरमध्ये बोलत होते. त्यावेळी त्यांनी म्हटलं की, भाजप सगळ्यांनाच ऑफर देते. त्यांच्याकडे 80 वर्ष वय झालेले लोक खासदार झालेले आहेत. मात्र कुठेतरी अजितदादा मित्र मंडळाचे नेते जो वयाचा मुद्दा पवार साहेबांबद्दल बोलतात. त्याला पाठबळ देण्याचं भाजप काम करत असताना दुसरीकडे अशा ऑफर दिल्या जात आहेत. कारण भाजपकडे मोठी आर्थिक शक्ती असून दबावतंत्र ते वापरत असल्याचे रोहित पवार म्हणाले.

Golmaal 5: अखेर चाहत्यांची प्रतिक्षा संपली, ‘गोलमाल 5’ चित्रपटाबद्दल मोठे अपडेट, स्क्रीप्टही…

त्याचबरोबर पूर्वी काही नेत्यांचा रुबाब आपण पाहत होतो. मात्र काही नेत्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. त्यात चार मोठे नेते मागील सीटवर दाटीवाटीने बसताना दिसत आहेत. दिल्लीमध्ये या नेत्यांना चर्चा नव्हे तर आदेश दिले जातात आणि त्यामुळे कुठेतरी कुणाला सहा जागा कोणाला आठ जागा दिल्या जाण्याची चर्चा आहे आणि राहिलेल्या जागा हे भाजप लढवेल असे चित्र दिसत असल्याचं रोहित पवार म्हणाले. भाजपमध्ये हुकूमशाही तर आमच्या राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसमध्ये लोकशाही असल्याचा टोला रोहित पवार यांनी महायुतीतील नेत्यांना लगावला.

Rajan Salavi यांच्या निवासस्थानी एसीबीची झाडाझडती; म्हणाले, अटक झाली तरी…

दरम्यान यावेळी रोहित पवार यांनी राष्ट्रवादी कोणाची? याचा आश्चर्यकारक निकाल येईल असं सूचक विधान केलं. ते म्हणाले की, राष्ट्रवादी पक्षात पडलेल्या फुटीवर आमदार अपात्रतेचा महत्त्वाचा निकाल 31 जानेवारी रोजी दिला जाणार आहे, मात्र हा निकाल आश्चर्यजनक असणारा असून अजित पवार मित्र मंडळाच्या विरोधात असेल असे आम्हाला वाटत असल्याचे रोहित पवार म्हणाले. आज कुठेतरी एकाला ताकद देण्याचे तर त्याचवेळी एकाची ताकद संपवण्याचे काम सुरू असून विधानसभा निवडणुकीपूर्वी दोघांचीही ताकद संपवली जाईल आणि त्यामुळे 31 जानेवारीचा निर्णय हा आश्चर्यजनक असलेला आपल्याला दिसेल.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज