Rajan Salavi यांच्या निवासस्थानी एसीबीची झाडाझडती; म्हणाले, अटक झाली तरी…

Rajan Salavi  यांच्या निवासस्थानी एसीबीची झाडाझडती; म्हणाले, अटक झाली तरी…

Rajan Salavi : ठाकरे गटाचे नेते राजन साळवी (Rajan Salavi ) यांच्या रत्नागिरीतील निवासस्थानी एसीबीच्या पथकाने झाडाझडती केली आहे. आतापर्यंत राजन साळवे यांनी सहा वेळा अलिबागमधील एसीबीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजेरी लावली होती. तर अर्धा तासाहून जास्त वेळा पर्यंत साळवी यांच्या घरामध्येही झडती सुरू आहे.

Koffee With Karan: “मी पाच लोकांना…”; ‘कॉफी विथ करण 8’च्या मंचावर केला मोठा गौप्यस्फोट

यावेळी राजन साळवे देखील काही वेळातच या निवासस्थानी दाखल झाले. त्यांनी सांगितलं की, या एसीबीच्या पथकाचे मी स्वागत केलं आहे. अँटी करप्शन ब्युरोने नोटीस दिल्यानंतरच मला हे अपेक्षित होतं की, अशाप्रकारे हे पथक आमच्या घरापर्यंत पोहोचेल. या प्रकरणांमध्ये अटक होऊ नाही. तर मी जेलमध्ये जाऊ मला कसली चिंता नाही. अशा प्रकारची चौकशी होणार याची कुण कुण अगोदरच लागली होती. असं म्हणत आपण साळवी यांनी दोषी आढळणार नसल्याचा निर्धार व्यक्त केला.

सुपर ओव्हरमध्ये अफगाणिस्तान फसला? रोहितच्या फलंदाजीमुळे वाद, जाणून घ्या, नियम

पुढे त्यांनी सांगितलं की, त्यांनी माझ्या भावांच्या आणि माझ्या घराची झाडाझडती घेतली. तसेच मी चौकशीला सामोरे जाणार नाही. असं म्हटल्यानंतरच ही चौकशी सुरू झाली. असल्याचेही त्यांनी सांगितलं. तसेच मी जेव्हा ठाकरे गटासोबत राहण्याचा निर्णय घेतला तेव्हापासूनच मलाही कारवाई होणं अपेक्षित होतं. असं म्हणत ही कारवाई राजकीय सुडातून होत असल्याचा देखील आरोप साळवी यांनी यावेळी केला.

Rohit Pawar : ‘राष्ट्रवादी’चा निकाल अजितदादांच्या विरोधात? रोहित पवारांनी नेमकं काय सांगितलं

दरम्यान नुकतीच कोरोना काळातील कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी ईडीने आदित्य ठाकरेंच्या (Aaditya Thackeray) जवळचा सहकारी सूरज चव्हाण (Suraj Chavan) याला अटक केली आहे. कोरोना काळात गरिब मायग्रेन कामगारांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. त्यासाठी महापालिकेकडून 52 कंपन्यांना कंत्राट देण्यात आलं होतं. सुरुवातीच्या 4 महिन्यात 4 कोटी खिचडीचे पॅकेट वाटप करण्यात आले पण यामध्ये घोटाळा झाल्याच आरोप करण्यात आला आहे.

त्यानंतर आता ठाकरे गटाच्या आणखी एका नेत्यावर अशाप्रकारची कारवाई सुरू झाली आहे. त्यावर संजय राऊत यांनी देखील जोरदार टीका करत सरकरवर आणि भाजपवर निशाणा साधला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज