MNS Chief Raj Thackrey war to Activist for BMC Election : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. यामध्ये विविध सभा आणि मेळावे आयोजित केले जात आहेत. अशाच एका मेळाव्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईवर डोळा आहे गाफील राहिलो तर मुंबई हातातून जाईल असं विधान केलं आहे. तसेच त्यांनी यावेळी मनसे कार्यकर्त्यांना सावध राहून कामाचा कानमंत्री दिला आहे.
काय म्हणाले राज ठाकरे?
मनसेचा कोकण महोत्सव पार पडला. यामध्ये बोलताना राज ठाकरे म्हणाले की, रात्र वैऱ्याची आहे, गाफील राहू नका आजूबाजूला लक्ष ठेवा. ज्या प्रकारचे राजकारण सध्या सुरू आहे. मुंबईवर ज्या प्रकारे डोळा आहे. मतदार याद्या आणि यातून जे काही सुरू आहे यावर लक्ष ठेवा. आपल्या आजूबाजूला कोण मतदार खरे आहेत? कोण खोटे आहेत यावर देखील लक्ष ठेवा. तसेच येणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक शेवटची महानगरपालिकेची निवडणूक असेल. जर आपण गाफील राहिलो तर हातातून गेली म्हणून समजा. त्यानंतर या लोकांचं जे थैमान सुरू होईल ते कुणालाही आवरता येणार नाही.
मनसेची मान्यता रद्द करा अन् राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल करा…
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अमराठी भाषिकांविरुद्ध चिथावणीखोर भाषणे आणि प्रक्षोभक वक्तव्ये केल्याने राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करुन मनसेची (MNS) मान्यता रद्द करण्यात यावी या मागणीसाठी उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे.न्यायालयाने याचिकेच्या वैधतेवर सवाल उपस्थित करत उत्तर भारतीय आणि अमराठी भाषिक हे शब्द याचिकेतून वगळण्याचे निर्देश दिले. तसेच उत्तर भारतीय आणि अमराठी असा वाद उपस्थित करण्याची गरज काय असा सवाल देखील न्यायालयाने याचिकाकर्ता सुनील शुक्ला यांना विचारले आहे.
एसआयआर सुधारणा नाही, गुन्हा; 16 बीएलओंच्या मृत्यूचे दाखले देत राहुल गाधींचा भाजप अन् आयोगावर निशाणा
तर दुसरीकडे या प्रकरणात सुनावणी करताना हा वाद केवळ द्वेषपूर्ण भाषण या शब्दातून सांगता येऊ शकतो आणि हा शब्द याचिकाकर्त्यांच्या भावना व्यक्त करण्यास पुरेशा आहे असं म्हटले आहे. यानंतर याचिकेतून उत्तर भारतीय आणि अमराठी शब्द वगळण्याची तयारी याचिकाकर्त्यांने वगळण्याची तयारी दर्शवली. यानंतर उच्च न्यायालयाने या याचिकेची नोंद घेत राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाला 4 आठवड्यात आपली भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले.
