Download App

बकरी ईदला मुंबईतील उच्चभ्रू सोसायटीत वादाची ठिणगी; बोकडाला हनुमान चालिसेने उत्तर

Mumbai Bakri Eid Festival Controversy:  बोकडाला हनुमान चालिसेने उत्तर आधी मुंबईतील एका सोसायटीत बकरी आल्याने एकच गोंधळ उडाला. गोंधळ इतका वाढला की याठिकाणी पोलिसांनाही बोलावावे लागले. बकरी ईदच्या दिवशी बोकडाचा बळी देण्याची मुस्लीम धर्मामध्ये परंपरा आहे. त्यामुळे सोसयटीमध्ये बोकड आणण्यात आला होता.

मुंबईतील मीरा रोडवरील एका सोसायटीत राहणाऱ्या एका कुटुंबाने कुर्बानीसाठी बोकड आणला होता. बोकड सोसायटीत आल्यानंतर तिथे राहणाऱ्या इतर लोकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. हे प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही, तर हिंदुत्ववादी संघटना, बजरंग दलाचे लोकही तेथे पोहोचले.

पंकजा मुंडेंचं भविष्य रामदास आठवलेंनी सांगितलं; BRS प्रवेशाच्या चर्चांवर म्हणाले…

सोसायटीमध्ये बोकडाची कत्तल करु नये म्हणून नागरिकांनी नोटीस लावली होती. तरीही सोसायटीतील काही जणांनी चक्क लिफ्टमधून बोकड आणला. रात्री उशीरा हा प्रकार घडला. सोसायटीमध्ये बोकड आणल्याचे समजताच इतर लोकांनी आंदोलनाला सुरुवात केली. असे प्रकार होऊ नये म्हणून सोसायटी परिसरात पोलिस तैनात करण्याची मागणी केली.

आंदोलन करणाऱ्या नागरिकांचे म्हणणे आहे की, कुर्बानीसाठी सोसायटीने परवानगी दिलेली नाही. असे असतानाही जबरदस्तीने 2 बोकड लिफ्टने सोसायटीत आणण्यात आले. त्यामुळे रात्री 11 वाजता परिस्थिती तणावपूर्ण बनली. यानंतर हिंदू अन् मुस्लीम असे दोन्ही गट आमने- सामने आले होते.

वरिष्ठ IRS अधिकारी ईडीच्या जाळ्यात; 500 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणात ठोकल्या बेड्या

यानंतर घटनास्थळावरुन जमावाला हटविण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. या परिसरामध्ये पिलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. पोलिस दोन्ही बाजूच्या लोकांना समजावण्याचा प्रयत्न करत होते.

यावेळी हिंदू संघटनेच्या लोकांनी तेथे हनुमान चालिसाचे पठण केले आणि त्यानंतर जय श्री रामचा नारा दिला. पोलिस प्रशासनाने प्रकरणाचे गांभीर्य पाहून गोंधळ घालणाऱ्या लोकांना शांत केले. पोलिसांनी समजावून सांगितल्यानंतर गोंधळ शांत झाला आणि दोन्ही बकऱ्यांना सोसायटीबाहेर नेण्यात आले. नियमांचा हवाला देत पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्या लोकांना आश्वासन दिले की सोसायटीत कुर्बानी देता येणार नाही. या प्रकरणानंतर समाजात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनानेही मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.

 

 

Tags

follow us