Male dominated culture : वडील किंवा आई गेल्यानंतर त्यांच्या पार्थिवाला पुरुषांनी मुखाग्नी देण्याची परंपरा आहे. मात्र हाच पायंडा मोडत मुलींनी आपल्या आईचे अंत्यसंस्कार केले आहेत. पुरुषप्रधान संस्कृतीला मागे टाकत आपल्या आईला पाच मुलींनी खांदा देवून भरलेल्या डोळ्यांनी अखेरचा निरोप दिला.
सामाजिक कार्यकर्त्या आणि अनुभूति ट्रस्टच्या संचालक दीपा पवार यांच्या आईचे 25 ऑगस्टला निधन झाले होते. अंत्यसंस्काराला पती किंवा मुलगा नसल्याची कोणतीही उणीव यावेळी त्यांच्या मुलींनी जाणवू दिली नाही. पाच मुलींनी सगळे विधी अगदी योग्य पद्धतीने पार पाडले. इतकंच नाही तर पाच मुलींनी आईला खांदा देत अंत्ययात्रा काढली. त्यांच्या या निर्णयाने काही नातेवाईक नाराज झाले तर काहींनी त्यांच्या निर्णयाला पाठिंबा दिला, असे दीपा पवार यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे.
मुलींना स्वत:च्या पायावर उभा केलं
दीपा पवार यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिले की आईने शेवटचा निरोप घेतला. कोलमडलेल्या मानसिक परिस्थितीत असताना देखील मला ही पोस्ट लिहाविशी वाटली. 25 तारखेला आई सोडून गेली. आई सोडून जाण्याच्या दुःख हे सर्वात जड दुःख आहे याची प्रचिती मी जवळून अनुभवली. घिसाडी कुटुंबात जन्माला आलेली माझी आई ही खूप श्रमजीवी बाई.
आम्हाला जगवण्यासाठी भट्टीवर राबण्यापासून, पुलावर कटलरी सामान विकणे, हातालां मिळेल ते काम ती करत गेली. लोखंडी कामावरवर तिचा विशेष जीव होता. वडील मुंबईत आलेल्या महाप्रलयकारी पावसात, पावसाच्या पाण्याने झालेल्या संक्रमनाणे गेले. त्यानंतर तर जगणं कठीण होऊन बसलं. मात्र आईने निभावून नेलं. अगदी हिरकणी सारखे शेकडो खरचटण्याचे व्रण सहन करत आम्हा पाच बहिणींना स्वत:च्या पायावर उभं केलं. तिच्या उपकाराची जाणीव करण्यास शब्द नाही. आणि सध्या हिंमत ही नाही.
दुहेरी हत्याकांडाने यवतमाळ हादरलं, 95 वर्षीय वैद्यासह सेवेकरी महिलेचा निर्घृण खून
संविधानाने बळ दिले
त्या पुढे लिहितात. मात्र येथे लिहिणे वेगळ्या कारणासाठी करत आहे. आईच्या जाण्याने मन सुन्न झालं. पण याच वेळी एक निर्णय घेण्याचं धाडस केलं. ते म्हणजे आईला खांदेकरी म्हणून आम्ही मुलींनी खांदा दिला. अग्नी देखील आम्ही 5 मुलींनी दिला. ज्यावेळी हा प्रस्ताव आम्ही जातीच्या पुढारी वर्गा समोर ठेवला. मला वाटलं. याला प्रचंड विरोध होईल. गडी माणसं, बायका चिडतील. मात्र घिसाडी या भटक्या जमातीतील पुढाऱ्यांनी प्रागतिक विचारांची साथ देत आमच्या निर्णया सोबत उभे राहण्याचा विवेक दाखवला.
भटक्या विमुक्तांमधील या सकारात्मक वळणाचे मला खूपच अप्रूप वाटत आहे. आईच्या अतीव दुःखात ही सोबत मला बळ देऊन गेली. खांदा देणं, अग्नी देणं ही कर्तव्य मी आजतागायत आमच्या समाजात मुलींनी केलेली पहिली नाही. मात्र याबद्दल बोलण्याच, मांडण्याचं आणि कृतीत आणण्याचं बळ मला भारतीय संविधानाने दिलेले आहे. त्यामुळेच मला व माझ्या बहिणींना हे शक्य झाले. हा विमुक्त महिना आणि या महिन्यात घिसाडी समूहाने मिळून एका प्रागतिक विचारास अंमलात आणण्यास जो बौद्धिक दिलदारपणा दाखवला त्याने मला प्रेरणा मिळाली आहे.
Chandrayaan 3 : चांद्रयान-3 ने शोधला खजिना! चंद्रावर ऑक्सिजन, सल्फर आढळलं
सावित्रीने प्रेरणा दिली
या निर्णयास साथ दिलेल्या घिसाडी जमातीतील त्या मंडळींना मला सांगावेसे वाटते की कोणालाही न जुमानता तुम्ही या निर्णयाचे पाठीराखे झालात. हे खूप सकारात्मक आहे. जमातीतील बाई माणसांनी, पुरुष वर्गाने जी सोबत केली ती येणाऱ्या काळात स्त्री सन्मांनाची नवीन उदाहरणे नक्की तयार करतील. ज्या स्त्रियांनी अशी उदाहरणे अगोदरच निर्माण केली आहेत. त्यांच्या वैचारिक वारसामुळेच आम्हाला हे करणे शक्य वाटले. माऊली सावित्रीची प्रेरणा उराशी घेऊनच. हातपाय थरथर कापत असताना. अंग थंडगार झालेले असताना आईला खांदा आणि अग्नी देण्याचे साहस एकवटता आले, असे दीपा पवार यांनी म्हटले आहे.
हरेगाव अमानुष मारहाण प्रकरण; केंद्रीय मंत्री रामदास आठवले पीडितांची भेट घेणार
सर्वानाच विचार मान्य होता का?
या निर्णयाने जाती अंतर्गत काही मंडळी आम्हाला स्मशानातूनच तर कोणी दारातूनच सोडून निघून गेली. आमच्यासोबत शब्द ही न बोलता गाव पाड्यात जाऊन माझ्या बद्दल नामुष्की करत आहेत. रीत मोडीत काढली. मुली बायका हे करण्याची रीत आहे का? असे बरेच कडू प्रश्न त्यांना बेचैन करत आहेत. दुःखात असलेल्या कुटुंबाला किमान सहानुभूती देणे त्यांना कठीण गेले. ज्यांना याने खूपच त्रास झाला. जो होणारच होता. पितृसत्ताक विचारधारेची नशा फार वाईट. तुम्ही या नशेतून लवकर मुक्त व्हावं. महिलांना बराबरीचे समजण्यास तुमच्या विवेक बुध्दीस नक्की जाग यावी, असे दीपा पवार यांनी म्हटले आहे.