दुहेरी हत्याकांडाने यवतमाळ हादरलं, 95 वर्षीय वैद्यासह सेवेकरी महिलेचा निर्घृण खून

दुहेरी हत्याकांडाने यवतमाळ हादरलं, 95 वर्षीय वैद्यासह सेवेकरी महिलेचा निर्घृण खून

Yavatmal Crime : यवतमाळ जिल्ह्यात (Yavatmal) धक्कादायक घटना घडली आहे. एका मठामध्ये वृद्ध वैद्यासह 60 वर्षीय सेवेकरी महिलेची हत्या करण्यात आली आहे. घटना सज्जनगड (Sajjangad) येथील मठात 29 ऑगस्टला सकाळच्या सुमारास उघडकीय आली आहे. यानंतर काही तासाच यातील मारेकऱ्यांना अटक करण्यात एलसीबी पथकाला यश आले आहे.

लक्ष्मण उर्फ चरणदास चंपत शेंडे (95, रा. कापशी, ता. राळेगाव) आणि पुष्पा बापुराव होले (60, रा. कळंब) अशी मृतक वैद्य आणि त्याच्या सेवेकरी महिलेचे नाव आहे. ते दोघेही गेल्या काही दिवसांपासून सज्जनगड येथे मुक्कामी होते.

यवतमाळ शहरापासून काही अंतरावर पांढरकवडा मार्गावर असलेल्या सज्जनगड येथील मठावर गेल्या अनेक वर्षापासून लक्ष्मण शेंडे राहत होते. त्यांना आयुर्वेदिक औषधींबाबत माहिती असल्याने ते औषधी तयार करुन रुग्णांना देत होते. अशात एकदा कळंब येथील पुष्पा होले ही टीबीग्रस्त महिला सज्जनगड येथे वैद्य लक्ष्मण शेंडे यांच्याकडे औषधीसाठी आली होती. त्यानंतर तिचा आजार बरा झाल्याने ती त्याच ठिकाणी सेवेकरी म्हणून राहत होती.

Yevgeny Prigozhin : वॅग्नर चीफ प्रिगोझिन जिवंत? खुद्द रशियातूनच केला जातो आहे दावा

वैद्य लक्ष्मण शेंडे यांच्या आयुर्वेदीक औषधांची महती बघता बघता परजिल्ह्यात जाऊ लागली. त्यामुळे परजिल्ह्यातील रुग्ण त्यांच्याकडे औषधांसाठी येत होते. त्यांच्या मठावर म्हशी, कोंबड्या असल्याने साफसफाईकरीता एक मुलगा काम करीत होता.

मात्र त्याची प्रकृती ठीक नसल्याने वैद्य शेंडे यांनी सोमवारी एक नवीन मुलगा कामाला ठेवला होता. दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी ते सज्जनगड येथे कामावर आला. परंतु त्याला झाडझूड करण्यासाठी खराटा दिसत नव्हता तर दुसरीकडे खाटेवर झोपलेले वैद्य लक्ष्मण शेंडे हे देखील प्रतिसाद देत नव्हते. त्या दोघांचा मृत्यू तर झाला नाही, असा संशय कामासाठी आलेल्या तरुणाला आल्याने त्याने घाबरुन पळ काढत तळेगाव गाठून गावकऱ्यांना माहिती दिली.

Asia Cup 2023: बांगलादेश-अफगाणिस्तान बिघडू शकतात अनेक संघांचा गेम प्लॅन, असा आहे विक्रम

याबाबत कळविण्यात आले होते. यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक पियूष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुजलवार यांच्यासह एससीबी पथक घटनास्थळी दाखल झाले. यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीकरीता सरकारी रुग्णालयात पाठवला होता. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube