हरेगाव अमानुष मारहाण प्रकरण; केंद्रीय मंत्री रामदास आठवले पीडितांची भेट घेणार

हरेगाव अमानुष मारहाण प्रकरण; केंद्रीय मंत्री रामदास आठवले पीडितांची भेट घेणार

श्रीरामपूर तालुक्यातील हरेगावमध्ये मागासवर्गीय तरुणांना झालेल्या अमानुष मारहाण प्रकरणं चांगलचं चिघळत असल्याची चिन्हे दिसून येत आहेत. मारहाणीची घटना घडल्यानंतर अनेक सामाजिक संघटनांसह आंबेडकरी समाजाकडून घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे. अशातच आता मारहाण प्रकरणातील पीडितांसह कुटुंबियांची भेट घेण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले येत्या 1 सप्टेंबरला हरेगावात येणार आहेत. यासंदर्भात आरपीआयचे युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे यांनी दिली आहे.

कबुतरे, शेळ्या चोरल्याच्या संशयावरुन हरेगावला श्रीरामपूरला चार मागासवर्गीय तरुणांना अर्धनग्न करुन झाडाला उलटे टांगून क्रूरपणे मारहाण झाल्याची घटना घडली होती. या घटनेचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्यावतीने निषेध नोंदविण्यात आला आहे.

Chandrayan 3 : ‘हॅलो पृथ्वीवासियांनो, लवकरच चांगली….; प्रज्ञान रोव्हरनं पाठवला खास संदेश

नेमकं प्रकरण काय?
मागासवर्गीय तरुणांवर बकऱ्या आणि कबुतरे चोरल्याचा संशय होता. त्यानंतर सहाही आरोपींनी या तरुणांना घरातून उचलून नेत गलांडे यांच्या शेतातील विहिरीवर नेले. तिथे कपडे काढून त्यांना अर्धनग्न केले. काही जणांनी दोरीने त्यांचे पाय बांधले, तर इतरांनी झाडाला उलटं लटकवत अत्यंत क्रुरपणे मारहाण केली, असे पीडित तरुणांच्या कुटुंबीयांनी सांगितले आहे.

Earthquake : इंडोनेशियात जमीन हादरली! भूकंपाच्या धक्क्याने लोक घराबाहेर पळाले

या मारहाणीत शुभम वाघाडे, कुणाल मगर, ओम गायकवाड, खंडागळे हे तरुण गंभीर जखमी झाले आहेत. सध्या त्यांना शिरापूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा व्हिडीओ शुक्रवारी रात्री उशीरा गावात व्हायरल झाला, त्यानंतर घटना वाऱ्यासारखी पसरली. व्हिडीओ पाहूनच काही तरुणांनी तातडीने शेतात धाव घेऊन या चारही मुलांची सुटका केली.

मागासवर्गीय तरुणांना अमानुषपणे मारहाणीचे प्रकरण उघडकीस आले आहे. माणुसकीला कलंक लावणाऱ्या प्रकरणाचा तीव्र शब्दात निषेध करण्यासाठी शुक्रवारी घटनास्थळी आठवले जाणार आहे. तसेच यावेळी ते पीडित तरुणांची व कुटुंबीयांची भेट घेणार आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करुन खटला जलदगती न्यायालयात चालवून, आरोपींना कठोर शिक्षा व्हावी व पीडित मुलांना न्याय मिळण्याची मागणी रिपाईच्यावतीने आठवले यांनी केली आहे.

दरम्यान, या प्रकरणी मुख्य आरोपी युवराज नानासाहेब गलांडेसह इतर दोघांना अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने या तिघांना अटक केली आहे. या प्रकरणी आत्तापर्यंत चार जणांना अटक केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube